मुंबई – ‘मला ‘मनसुख हिरेन’ व्हायचे नाही’, असे म्हणत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथिमीरे यांच्या विरोधात तक्रार करणार्या व्यक्तीची तक्रार वसई पोलीस ठाण्यात नोंदवून घेतली जात नसल्याचा आरोप विरार येथील मयुरेश राऊत यांनी केला आहे. ‘वर्ष २०१७ मध्ये माझ्या २ गाड्या ठाणे खंडणीविरोधी पथक घेऊन गेले. चोरी, अपहरण आणि जीवितास धोका असल्याप्रकरणी गुन्हा नोंद करावा. तक्रार नोंदवून अन्वेषण करावे’, अशी मागणी मयुरेश यांनी केली आहे.