(म्हणे) ‘तालिबानी आतंकवादाप्रमाणे हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा !’

आपण हिंदुत्ववादी आतंकवादावरही आक्षेप नोंदवायला हवा, असे ट्वीट अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी केले आहे. त्या माध्यमातून त्यांनी तालिबानी आतंकवाद्यांची तुलना हिंदुत्वनिष्ठांशी केली आहे.

९८ सहस्र एस्.टी.चे कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत !

प्रति मासाच्या ७ दिनांकाला होणारे वेतन ऑगस्ट मासाचा १५ दिनांक उलटूनही मिळालेले नाही. त्यामुळे घराचा व्यय भागवण्याची मोठी समस्या कर्मचार्‍यांसमोर आहे.

सर्वांना लोकल प्रवासासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका !

राज्य सरकारच्या अध्यादेशामुळे लस न घेतलेल्या अथवा लसीचा एकच डोस घेतलेल्या नागरिकांच्या उपजीविकेवर गदा येणार आहे.

मनसेचे गजानन काळे यांना लवकरच अटक करणार ! – पोलीस आयुक्त

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग यांनी दिली आहे.

अनिल देशमुख यांना अन्वेषणाला उपस्थित रहाण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडून समन्स !

अनिल देशमुख यांनी कारवाईला स्थगिती मिळावी, यासाठी केलेला अर्ज सर्वाेच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे आता अंमलबजावणी संचालनालयाकडे अन्वेषणासाठी उपस्थित रहाण्याविना देशमुख यांच्यापुढे कोणताही पर्याय राहिलेला नाही.

जुन्या कंत्राटदाराला भंगार विक्रीचे कंत्राट दिल्याने महापालिकेची ५ कोटींची हानी !

एका कंत्राटदाराने पालिका आयुक्तांकडे याविषयी तक्रार केली आहे. या प्रकरणी भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी या कंत्राटामागे काहीतरी घोटाळा असल्याचा आरोप केला आहे.

मुंबईत मैदाने, उद्याने, चौपाट्या, समुद्रकिनारे सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत खुली !

मुंबईत काही दिवसांपासून रुग्णवाढ आणि मृत्यूदर यांत घट झाली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असल्याने महापालिकेच्या प्रशासनाने वरील निर्णय घेतला आहे. सामान्यांसाठी मुंबई लोकल चालू करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ रुग्णांची संख्या ६६ वर पोचली !

जळगाव येथे १३, रत्नागिरी १२, मुंबई ११, ठाणे आणि पुणे येथे प्रत्येकी ६, पालघर अन् रायगड येथे प्रत्येकी ३, नांदेड अन् गोंदिया येथे प्रत्येकी २, तर चंद्रपूर, अकोला, सिंधुदुर्ग, सांगली, नंदुरबार, संभाजीनगर, कोल्हापूर आणि बीड येथे प्रत्येकी १ रुग्ण आहे.

मुंबई महापालिकेच्या कोरोनावरील लसीकरण मोहिमेचे मुंबई उच्च न्यायालयाकडून कौतुक !

३० जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत शहरातील ४ सहस्र ८८९ नागरिकांपैकी १ सहस्र ३१७ नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती पालिकेकडून न्यायालयाला देण्यात आली.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार्‍यांनी मराठीचा वापर करण्याची मागणी !

हे सांगावे का लागते ? प्रत्येक ठिकाणी होणारी मराठीची गळचेपी रोखायला हवी !