कोरोनाच्या चाचणीच्या खोटा अहवाल देणार्‍या खासगी प्रयोगशाळेच्या धर्मांध तंत्रज्ञाला अटक !

रुग्णांची फसवणूक करणार्‍या धर्मांधांना कठोर शासन करावे !

महाराष्ट्रातील घटनांमुळे सर्वसामान्य माणूस निराशेकडे चालला आहे ! – चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, भाजप

“राज्यात कोरोनावरील उपचारांचा गोंधळ उडाला आहे. लसीकरणाचा पत्ता नाही. त्याच्यासाठी प्रयत्न करायचे नाहीत. प्रत्येक विषयात केंद्रशासनाला दोष द्यायचा असेल, तर राज्य केंद्राकडेच चालवायला द्या.”

मुंबईत लसीअभावी ४० टक्के लसीकरण केंद्रे बंद

मुंबईमध्ये केवळ दीड दिवस पुरेल इतकाच कोरोनावरील लसीचा साठा शेष आहे. मुंबईमध्ये एकूण १२० लसीकरण केंद्रे आहेत. त्यांतील ४० लसीकरण केंद्रे लसीच्या अभावी बंद झाली आहेत.

मुंबईतील ‘मॉर्निंग स्टार स्कूल’कडून घेण्यात येणारी तिसरीची परीक्षा शिक्षण विभागाने थांबवली !

‘मॉर्निंग स्टार स्कूल’सारख्या ख्रिस्ती मिशनरी शाळांची नोंदणी त्वरित रहित करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी

शरद पवार यांची मनधरणी करण्यासाठी अनिल देशमुख यांनी २ कोटी रुपयांची खंडणी मागितली !

परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणीचा आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा गंभीर आरोप मुंबई – वर्ष २०२० मध्ये मला पोलीसदलात घेण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. माझी नियुक्ती रहित करण्यात यावी, अशी शरद पवार यांची इच्छा होती; मात्र ‘शरद पवार यांचे मतपरिवर्तन करून गुन्हेगारी गुप्तवार्ता शाखेत नियुक्ती करू’, असे सांगून माजी … Read more

कुर्ला (मुंबई) येथे गुलाब इस्टेटमध्ये भीषण आग

कुर्ला येथील गुलाब इस्टेटमध्ये स्पेअर पार्ट्सच्या गोदामांना भीषण आग लागली. आगीचे कारण कळू शकले नाही.

प्रशासकीय कामात माझ्याकडून राजकीय हस्तक्षेप केला जाणार नाही ! – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी पावले टाकणे आवश्यक आहे. मी स्वच्छ प्रशासन देण्याचा प्रयत्न करीन. पोलिसांच्या स्थानांतरामध्ये जे अधिकार दिलेले आहेत, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील.

परमबीर सिंह यांना १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा साक्षात्कार स्थानांतरानंतर का झाला ? – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे म्हणाले, ‘‘माझ्यासाठी अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता. ‘कुणाच्या सांगण्यावरून मुकेश अंबानी यांच्या घराजवळ पोलिसांनी जिलेटिनची गाडी ठेवली ?’ हा मूळ विषय आहे. त्याचे अन्वेषण होणार आहे का ?

अनिल देशमुख यांचे गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र

न्यायालयाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचे त्यागपत्र दिले.

अन्वेषणातून इतके विषय बाहेर येतील की, राजकारणावरील जनतेचा विश्‍वास उडेल ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

मंत्रीमंडळातील एक मंत्री १५ वर्षे एका महिलेशी संबंध ठेवल्याचे उघडपणे सांगतो, ठेवतो, दुसरा मंत्री २२ वर्षांच्या युवतीसमवेत संबंध ठेवतो, गृहमंत्री १०० कोटी रुपयांची वसुली मागतात हे विषय आतापर्यंत बाहेर पडले आहेत.