शिवसेनेचा वर्धापनदिन यंदाही ‘ऑनलाईन’ ! – संजय राऊत, खासदार

कोरोनामुळे शिवसेनेचा वर्धापनदिन मागील २ वर्षांप्रमाणे याही वर्षी १९ जून या दिवशी ‘ऑनलाईन’ पद्धतीने साजरा होणार आहे, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

माओवाद्यांचे पुढील लक्ष्य मुंबईतील झोपडपट्ट्या !

माओवाद्यांनी लक्ष्यपूर्ती करण्यापूर्वीच सरकारने माओवाद समूळ नष्ट करण्यासाठी तत्परतेने पावले उचलावीत !

(म्हणे) ‘वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा नवऱ्याच्या नावाचे झाड लावा !’ – अभिनेत्री हेमांगी कवी यांचे विधान

हिंदूंच हिंदु धर्माचे खरे वैरी ! अशा जन्महिंदूंनी आपले धार्मिक सण, व्रते यांविषयीचे शास्त्र समजून न घेता काहीही बरळणे, ही सध्या ‘स्टंटबाजी’ झाली आहे. सवंग प्रसिद्धीसाठी अशी मुक्ताफळे उधळणाऱ्यांना हिंदूंनी वेळीच संघटितपणे खडसावल्यास अशा गोष्टींना आळा बसेल !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आषाढीच्या महापूजेचे निमंत्रण

पंढरपूरच्या ‘विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती’च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वर्षा शासकीय निवासस्थानी १० जुलै या दिवशी असलेल्या आषाढी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचे निमंत्रण देण्यात आले

राजभवन हे महाराष्ट्रातील जनतेसाठी नवी ऊर्जा देणारे लोकभवन ! – पंतप्रधान मोदी

राजभवनामध्ये क्रांतीगाथा दालनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेही उपस्थित होते.

शिकाऊ आधुनिक वैद्यांनी चुकीचे इंजेक्शन दिल्याने महिलेला डोळा गमवावा लागला !

इंजेक्शन देण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या आधुनिक वैद्यांना बडतर्फच करायला हवे !

ढोंगी हिंदुत्वाकडून असली हिंदुत्वाकडे प्रवास चालू होवो ! – मनसे

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे १५ जून या दिवशी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याविषयी मनसेने त्यांच्यावर ‘ढोंगी हिंदुत्वाकडून असली हिंदुत्वाकडे प्रवास चालू होवो’, अशी टीका केली आहे.

भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला !

भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. गोरे यांच्या विरोधात भूमीची खोटी कागदपत्रे बनवून फसवल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे.

कोरोनामुळे राज्यातील २५ सहस्र विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ! – प्रा. वर्षा गायकवाड, शिक्षणमंत्री

कोरोनामुळे मागील दोन वर्षांत राज्यातील २५ सहस्र विद्यार्थी शालेय शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. त्यांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्या ! – काँग्रेस

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (निर्माणाधीन) प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. या संदर्भातील एक ठराव काँग्रेसच्या ‘ओबीसी मंथन शिबिरा’त संमत करण्यात आला आहे.