मुंबईसह कोकणाला ५ दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ !

हवामान विभागाने २० आणि २१ जून या दिवशी मुंबईसह उपनगरासाठी अन् २० ते २३ जून या कालावधीत कोकणासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारताने क्षमा मागण्याचे कतार सरकारचे अधिकृत पत्र त्याने मागे घ्यावे, अन्यथा आंदोलन करू !

खरेतर भारत सरकारनेच कतारला पत्र मागे घेण्याविषयी खडसवायला हवे !

कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या सरचिटणीसपदी सौ. प्रविणा पाटील यांची निवड !

देशातील ट्रेड युनियनच्या इतिहासामध्ये संघटनेच्या सरचिटणीस पदावर महिला पदाधिकारी यांची यापूर्वी निवड झाली नव्हती. सौ. प्रविणा पाटील या सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात.

भारत सरकारने क्षमा मागण्याविषयीचे अधिकृत पत्र कतार सरकारने मागे घ्यावे, अन्यथा आंदोलन करू !

अशी मागणी का करावी लागते ? भारत सरकारच कतारला पत्र मागे घेण्याविषयी का खडसावत नाही ?

महाराष्ट्रात गौरवशाली इतिहास पर्वतरांगांवर कोरण्यात येणार !

महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पर्वतरांगांवर इतिहास जतन करण्याची ही अनोखी संकल्पना मांडली आहे. ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी प्रकल्पाची व्यवहार्यता पडताळणे, तसेच सविस्तर आराखडा सिद्ध करण्यासाठी सल्लागार नेमणे हे निर्णय घेतले आहेत.

राज्यात दहावीचा निकाल ९६.९४ टक्के !

राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला, तर नाशिक विभागाचा निकाल सर्वांत अल्प लागला. यंदाही निकालात मुलीच पुढे आहेत. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ९४.४० टक्के लागला आहे.

मुंबई विद्यापिठासह राज्यातील तीन संकेतस्थळे ‘हॅक’

राज्यातील मुंबई विद्यापीठ, ठाणे पोलीस आणि उत्तन ज्युडिशियल अकादमी ही ३ संकेतस्थळे ‘हॅक’ करण्यात आली आहेत. या प्रकरणी राज्य सायबर विभागाने चौकशी चालू केली असून यामध्ये पॅलेस्टाईन येथील हॅकर्स गटाचा हात असल्याचा संशय आहे.

नारायण राणे यांच्या अवैध बांधकाम प्रकरणात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या अधिश बंगल्यामध्ये अवैध बांधकाम केले आहे. या प्रकरणी सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने पाठवलेल्या नोटिशीविरोधात नारायण राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

महाराष्ट्र पोलिसांचा मौलानांशी संवाद साधून निदर्शने टाळण्यासाठी प्रयत्न

पोलिसांची गांधीगिरी ! असे ‘संवाद’ साधून किती दंगली रोखल्या गेल्या आहेत का ? कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाईच केली पाहिजे !

शालेय शुल्कवाढीच्या विरोधात शिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्याची पालकांना मुभा !

प्रतिवर्षी खासगी शाळा मनमानी पद्धतीने शुल्कवाढ करतात आणि पालकांना हतबल व्हावे लागते, यावर सरकारने कायमचा तोडगा काढावा !