दगाफटका करणाऱ्या आमदारांची नावे आमच्याकडे आहेत ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाफटका केला नाही. घोडेबाजारात उभे होते, त्यांची ६-७ मते आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणता व्यापार केला नाही. असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले.

सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा ! – दत्तात्रय भरणे, वन राज्यमंत्री

सागरेश्वर अभयारण्याला मजबूत कुंपण उभारणे, जल मृदसंधारण करणे, गवत कुरण विकास करणे, वन वणवा नियंत्रण ही कामे प्राधान्याने करून तसेच स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून तात्काळ मार्गी लावावीत..

वांद्रे-वरळी सागरी मार्गावरील अपघातात २ जण ठार !

वांद्रे-वरळी सी लिंकवर झालेल्या एका भीषण अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला, तर दुसऱ्या गंभीर घायाळ व्यक्तीचा उपचाराच्या कालावधीत मृत्यू झाला आहे. ३० मे या दिवशी झालेल्या या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

मुंबईत दुचाकीवरील दोघांना हेल्मेट सक्ती लागू !

मुंबई वाहतूक पोलिसांनी ९ जून या दिवशी शहरात शिरस्त्राण (हेल्मेट) न घालणारे दुचाकीचालक आणि त्यांच्या मागे बसलेल्या व्यक्ती यांच्यावर कडक कारवाई केली आहे. ९ जून या दिवशी ६ सहस्र २७१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईत पॉक्सोसह विनयभंग हे गुन्हे पोलीस उपायुक्तांच्या अनुमतीने नोंद होणार ! – पोलीस आयुक्त

मुंबई परिसरातील पोलीस ठाण्यात ‘पॉक्सो’ (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा) किंवा विनयभंग या संदर्भातील गुन्हे नोंद करण्यापूर्वी पोलीस उपायुक्तांची अनुमती घ्यावी लागणार आहे. याविषयीचा आदेश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिला आहे.

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा मतदानासाठीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांनी एक दिवसाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाकडे केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

वांद्रे येथे इमारत कोसळून एकाचा मृत्यू !

वांद्रे येथील शास्त्रीनगर परिसरात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ बचाव पथक, अग्नीशमन दलाच्या गाड्या, तसेच पोलीस घटनास्थळी आले.

भारतात हिंदु राष्ट्र स्थापित झाल्यावरच विश्वात शांतता आणि बंधुभाव निर्माण होईल ! – ईश्वरप्रसाद खंडेलवाल, अध्यक्ष, लष्कर-ए-हिंद

एकदा का भारतात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना झाली की, विश्वभरातील शत्रुत्वाची भावना नष्ट होऊन शांतता प्रस्थापित होणार आहे.

इयत्ता बारावीच्या निकालात कोकण विभाग पहिल्या क्रमांकावर !

राज्यात कोकण विभाग ९७.२२ टक्क्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ९६.५२ टक्के निकाल लागलेला नागपूर जिल्हा असून तिसऱ्या क्रमांकावर ९६.३४ टक्के मिळालेला अमरावती विभाग आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांकडे दुर्लक्ष केल्यानेच शत्रू देश कुरापती काढत आहेत ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

‘राष्ट्राचा उद्धार’, हेच ध्येय ठेवून आपण समर्पित झाले पाहिजे. राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा यांचा त्याग करणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे.