पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुराज्याचा संकल्प करूया ! – सुधीर मुनगंटीवार, वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री

गांधीजयंतीनिमित्त राज्यात ‘वन्दे मातरम्’ अभियानाला प्रारंभ !

सुधीर मुनगंटीवार

मुंबई – स्वातंत्र्याचे उद्दिष्ट गुलामगिरीतून मुक्तता आणि शेवटच्या घटकाचे कल्याण हे होते. स्वातंत्र्यसंग्रामाच्या लढ्याचे यशस्वी नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले. गांधीजींच्या नेतृत्वात स्वातंत्र्यसंग्राम झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुराज्याचा संकल्प करूया, असे आवाहन राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. २ ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीनिमित्ताने वर्धा येथे ‘वन्दे मातरम् ।’ अभियान आणि नदी महोत्सव यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. या वेळी सुधीर मुनगंटीवार यांनी वरील आवाहन केले.