स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दादर आणि गोवंडी येथील शाखांनी साप्ताहिक सुटी शुक्रवार करण्याचा निर्णय घेतला मागे !

वास्तविक असा निर्णय घेतलाच कसा ? हे अधिकोष पाकिस्तानात आहे का ? हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तक्रार नोंदवली नसती, तर हे असेच चालू राहिले असते. शुक्रवारची सुटी घोषित करणार्‍यांवर प्रथम कारवाई करा !

‘द काश्मीर फाइल्स’ मधील एक जरी दृश्य असत्य असेल, तर चित्रपटनिर्मिती सोडून देईन ! – विवेक अग्निहोत्री, चित्रपट निर्माते

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटासंदर्भात मनोगत व्यक्त करतांना ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी हा चित्रपट प्रपोगंडा असल्याची टीका केली. त्यावर विवेक अग्निहोत्री यांनी वरील उत्तर दिले.

गायरान भूमीवरील घरे प्रधानमंत्री आवास योजनेतून नियमित करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्यातील गायरान भूमीवर असलेल्या भूमीहीन नागरिकांची घरे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत नियमित करण्यात येतील. सरकारचा हा निर्णय सर्वाेच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्णयाला अधीन राहून घेण्यात आला आहे.

संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्याच्या कार्यक्रमाला राज्यशासनाकडून मुदतवाढ !

मानवाच्या गरजा भौतिक विकासामध्ये येतात, तर शाश्वत विकास केवळ अध्यात्मामुळेच साधला जातो. यासाठी साधना करणे आवश्यक आहे !

कुंकू लावण्यामागील आध्यात्मिक कारण जाणून घेतले पाहिजे ! – वैद्या (सौ.) दीक्षा पेंडभाजे, रणरागिणी शाखा

भांडुप येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु ऐक्याचा हुंकार !

महाराष्ट्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील १९ लाख विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नाही !

एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकांना ऑनलाईन भरता येत नाही.

अमली पदार्थ तस्करी करणार्‍या रेल्वे पोलीस दलातील अधिकार्‍यासह शिपाई बडतर्फ !

कुंपणच शेत खायला लागले, तर दाद कुणाकडे मागायची ?, अशी स्थिती झालेले पोलीस दल !

मीरारोड येथील ख्रिस्त्यांच्या कार्यक्रमाच्या विरोधात बजरंग दलाची पोलिसात तक्रार !

मीरारोड येथील एन्.एच्. मैदानावर २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत ‘बायबल कन्व्हेंशन मीरारोड २०२२’ या कार्यक्रमाच्या विरोधात बजरंग दलाच्या वतीने नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

वीजदेयक भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या दोघांना झारखंडमधून अटक !

अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !

मुंबई : ५८ लाख ५० सहस्र रुपयांचे अवैध ‘ई-सिगारेट’ जप्त !

केंद्र सरकारने ई-सिगारेटवर बंदी घातलेली असतांना त्या मालाची इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होतेच कशी ? यावर पोलिसांचे नियंत्रण का नाही ?