वीजदेयक भरण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्‍या दोघांना झारखंडमधून अटक !

मुंबई – वीजदेयक भरले नसल्याचा ग्राहकांना संदेश पाठवून त्यांची ऑनलाईन फसवणूक करणार्‍या दोघांना मुंबई पोलिसांनी झारखंडमधून अटक केली आहे. सचिनकुमार भरत मंडल (वय २४ वर्षे) आणि संजितकुमार सीताराम मंडल (वय २५ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.

तक्रारदार सुधीर माने यांच्या भ्रमणभाष क्रमांकावर ‘वीजदेयक भरले नसल्यामुळे तुमची वीज खंडित करण्यात येईल’, असा संदेश आला होता. त्यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क केला. समोरच्या व्यक्तीने एका लिंकवर पैसे पाठवण्यास सांगितले. माने यांनी त्या लिंकवर प्रथम १० रुपये पाठवल्यावर त्यांच्या खात्यातून आरोपींनी ५५ सहस्र रुपये काढले. त्यानंतर तो क्रमांक बंद लागत होता. फसवणूक झाल्याने माने यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून ६ भ्रमणभाष आणि १० सीमकार्ड जप्त केली आहेत.

संपादकीय भूमिका 

  • अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !
  • नागरिकांनाही सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रकार पहाता सतर्क रहायला हवे !