मुंबईमध्ये गर्दीच्या ठिकाणी मुसलमान युवकांकडून परदेशी युवतीशी अश्‍लाघ्य वर्तन !

परदेशी युवतीशी असे वर्तन करून जगात भारताला अपर्कीत करणारे वासनांध ! अशांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !

असंरक्षित गड-दुर्गांची जिल्हानिहाय माहिती गोळा करण्यात येणार !

गड-दुर्गांची माहिती देण्यासाठी स्थानिक युवकांना प्रशिक्षण देणार !

गायरान भूमीवरील २ लाख २२ सहस्र घरे गावठाण पट्टे म्हणून नियमित करण्याविषयी चाचणी करणार ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

एवढ्या प्रचंड प्रमाणात अतिक्रमण वाढेपर्यंत प्रशासन डोळे मिटून का रहाते ? ही अतिक्रमणे नियमित करून सरकार गायरान भूमीसाठी वेगळी जागा देणार का ?

राज्यातील ७५ सहस्र शासकीय पदांच्या भरतीची विज्ञापने जानेवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध होणार !

शासनाच्या विविध १४ विभागांतील रिक्त पदांची माहिती १५ डिसेंबरपर्यंत शासनाकडे सादर केलीच पाहिजे, अशी सक्त ताकीद सरकारकडून देण्यात आली आहे. याचा अभ्यास करून जानेवारी २०२३ मध्ये राज्यातील ७५ सहस्र शासकीय पदांच्या भरतीची विज्ञापने प्रसारित करण्यात येणार आहेत.

राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांच्या अन्वेषणासाठी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री

मागील अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले उद्योग कोणत्या कारणांमुळे गेले याचे अन्वेषण करण्यात येणार आहे. माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करून येत्या ३ मासांत याविषयीचा अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

राज्यात ३ डिसेंबरपासून स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग कार्यरत होणार !

सध्या महाराष्ट्रात ३० लाखाहून अधिक दिव्यांग व्यक्ती आहेत. त्यांना सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभाग यांद्वारे दिव्यांगांना सेवा दिली जाते. या दोन्ही विभागांतील कार्यासने एकत्रित करून दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात येणार आहे.

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे १९ वर्षांतील सेवेतील १७ वे स्थानांतर !

अद्याप कोणत्या विभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली, हे सरकारकडून घोषित करण्यात आलेले नाही. वर्ष २००५ मध्ये सनदी अधिकारी म्हणून सेवेत असलेल्या तुकाराम मुंढे यांची मागील १९ वर्षांच्या सेवेतील हे १७ वे स्थानांतर !

तुर्भे येथील उद्यानाची दुरवस्था; रहिवाशांना उद्यानात जाण्यास बंदी  

येथील नागरिकांना या उद्यानात चालण्यास, तसेच ज्येष्ठ नागरिकांना बसण्यास अटकाव केला जात आहे. इतकेच नव्हे, तर लहान मुलांना खेळण्यासाठी आत जाऊन दिले जात नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाला भेट दिली. मुलुंड (पूर्व) येथील तालुका क्रीडासंकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या कोकण महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने हे ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले आहे.

शिवडी गडावरील अनधिकृत बांधकाम ३ मासांत काढणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनविकास मंत्री

अनधिकृत बांधकाम हटवण्यासह ते होईपर्यंत झोपा काढणार्‍या प्रशासनातील संबंधितांवरही कारवाई करावी, अशी गडप्रेमींची अपेक्षा आहे !