मुंबई पोलिसांची कारवाई !
‘ई- सिगारेट’ किंवा ‘इलेक्ट्रॉनिक सिगरेट’: तंबाखूजन्य सिगरेट न ओढता तंबाखूमध्ये असलेलं निकोटिन हे द्रव्य शरीरात घेण्याचा एक मार्ग म्हणून ही सिगारेट वापरली जाते
मुंबई – मुंबई पोलिसांनी अवैध ‘ई-सिगारेट’वर धडक कारवाई करत ५८ लाख ५० सहस्र रुपयांचे सिगारेट जप्त केले आहे. ई-सिगारेटच्या वापरामुळे आरोग्यावर घातक परिणाम होत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ई-सिगारेटवर बंदी घातली आहे. मुंबईमधील एकाकडून मोठ्या प्रमाणात ई-सिगारेटचा माल विक्रीसाठी मागवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आतापर्यंतच्या ई-सिगारेटच्या प्रकरणात पोलिसांनी १९ आरोपींविरुद्ध गुन्हे नोंद केले आहेत.
संपादकीय भूमिकाकेंद्र सरकारने ई-सिगारेटवर बंदी घातलेली असतांना त्या मालाची इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होतेच कशी ? यावर पोलिसांचे नियंत्रण का नाही ? |