मीरारोड येथील ख्रिस्त्यांच्या कार्यक्रमाच्या विरोधात बजरंग दलाची पोलिसात तक्रार !

मुंबई – मीरारोड येथील एन्.एच्. मैदानावर २५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत ‘बायबल कन्व्हेंशन मीरारोड २०२२’ या कार्यक्रमाच्या विरोधात बजरंग दलाच्या वतीने नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. ‘या कार्यक्रमातून अंधश्रद्धा पसरवली जात असल्यामुळे त्यावर बंदी घालावी’, अशी मागणी बजरंग दलाकडून करण्यात आली आहे. ‘या कार्यक्रमात हिंदु धर्माच्या विरोधात काेणते कृत्य झाल्यास कार्यक्रमाला विरोध करू’, अशी चेतावणी बजरंग दलाने दिली आहे.