३० नोव्हेंबर या दिवशी नवाब मलिक यांच्या जामिनावरील सुनावणी !

गोवावाला कंपाऊंड खरेदी आर्थिक अपहाराच्या प्रकरणी नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. सध्या नवाब मलिक न्यायालयीन कोठडीत आहेत.

पक्षवाद आणल्यास महाराष्ट्र-कर्नाटक सीमेचा दावा खिळखिळा होऊ शकतो ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘महाराष्ट्राची भूमिका कायम आहे. आमची मागणी संविधानिक आहे. बेळगाव, कारवार आणि निपाणी यांवरील दावा आम्ही सर्वाेच्च न्यायालयात केला आहे.”

भविष्य पाहिल्याचा कांगावा करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांसह ज्योतिषशास्त्रावर टीका !

हिंदु धर्मामध्ये ज्योतिषशास्त्राचा ‘शास्त्र’ म्हणून अभ्यास केला जातो. याउलट ज्योतिषशास्त्राचा काडीचाही अभ्यास न करता त्यावर टीका करणारेच खर्‍या अर्थाने अंधश्रद्धाळू आहेत !

महाराष्ट्रातील विद्यापिठांतील भाषा विभागांमध्ये पूर्णवेळ प्राध्यापकांचा अभाव !

असे असेल, तर विद्यार्थी भाषासंपन्न कसे होणार ? नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत नियमित प्राध्यापक भरतीसाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहे !

महाराष्ट्रातून एकही गाव बाहेर जाणार नाही, याचे दायित्व आमचे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ४० गावे कर्नाटकमध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असल्याचे म्हटले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी अशी प्रतिक्रिया दिली.

‘कॅग’कडून मुंबई महापालिकेतील व्यवहारांची चौकशी !

‘कॅग’कडून (‘कम्प्ट्रोलर अँड ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया’) महापालिकेतील १२ सहस्र कोटी रुपयांच्या व्यवहारांच्या चौकशीला प्रारंभ करण्यात आला आहे.

माहीम (मुंबई) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत उपस्थित हिंदूंची धर्मकार्यात सहभागी होण्याची सिद्धता !

या एकवक्ता सभेला पुष्कळ राष्ट्र आणि धर्म प्रेमी उपस्थित होते. सभा संपल्यानंतर ३९ धर्मप्रेमींनी समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांच्याशी अनौपचारिक संवाद साधून धर्मकार्यात सहभागी होण्याची सिद्धता दर्शवली.

मुंबई येथे महापालिकेचा अधिकारी असल्याचे सांगत चोरीचा प्रयत्न करणार्‍याला अटक !

कायदा-सुव्यवस्थेचा धाकच नसल्याचे हे लक्षण !

डिसेंबर अखेरपर्यंत अतिक्रमणे हटवण्याची सरकारची भूमिका, घरे नियमित करण्याची भूमिका !

गायरान भूमीवरील अतिक्रमणाविषयी राज्य सरकारकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर ! सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या पाठिंब्याने अतिक्रमणे !

मुंबईमध्ये गोवरमुळे १० जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या २०८ !

शहरात गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये गोवरमुळे १० जणांचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या २०८ वर पोचली आहे.