संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकासाचे ध्येय गाठण्याच्या कार्यक्रमाला राज्यशासनाकडून मुदतवाढ !

संयुक्त राष्ट्र संघाकडून शाश्वत विकास ध्येयाच्या अंतर्गत राबवण्यात येणारा मानव विकास कार्यक्रम (चित्रावर क्लिक करा)

मुंबई, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – गरिबी निर्मूलन, अन्नसुरक्षा, शिक्षण, आरोग्य आणि महिला अन् युवती यांचे सक्षमीकरण यांसाठी संयुक्त राष्ट्र संघाकडून शाश्वत विकास ध्येयाच्या अंतर्गत राबवण्यात येणार्‍या मानव विकास कार्यक्रमाला शासनाकडून मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. वर्ष २०३० पर्यंत शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाकडून हा कार्यक्रम देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील २३ जिल्ह्यांतील १२५ तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम राबवला जाणार आहे.

संपादकीय भूमिका 

मानवाच्या गरजा भौतिक विकासामध्ये येतात, तर शाश्वत विकास केवळ अध्यात्मामुळेच साधला जातो. यासाठी साधना करणे आवश्यक आहे !