महाराष्ट्राची ‘साडेतीन शक्तीपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ यांवर आधारित चित्ररथाला दुसर्‍या क्रमांकाचा मान !

प्रजासत्ताकदिनाला कर्तव्यपथावरील परेडमध्ये सादर करण्यात आलेल्या १७ राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला आहे.

वाहतूक पोलिसांच्या ‘इंटरसेप्टर’ वाहनांच्या मागणीच्या प्रस्तावावर कार्यवाही नाही !

वाहतुकीच्या नियमनासाठी ३ वर्षे उलटूनही सुविधा उपलब्ध करून न देणे, हे अपेक्षित नाही ! वाहतुकीच्या प्रश्नाकडे सरकारने गांभीर्याने पहावे !

‘लव्ह जिहाद’विरोधी कायद्यासाठी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात एकवटला हिंदु समाज !

भाजप, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था यांसह स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्च्यात सहभागी झाले होते.

धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या बंदी कायदे आणणार्‍या सरकारलाच हिंदू पाठिंबा देतील ! – आमदार टी. राजासिंह

जे हिंदुत्वासाठी कार्य करतील, तेच महाराष्ट्रात राज्य करतील. येणारा काळ संघर्षाचा आहे. सर्व हिंदूंनी संघटित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा व्हावे लागेल. भविष्यात भारत देश अखंड हिंदु राष्ट्र होईल.

मालाड (मुंबई) येथील ‘टिपू सुलतान’ उद्यानाचे नाव पालटण्याचा जिल्हाधिकार्‍यांना आदेश !

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अस्लम शेख मुंबईचे पालकमंत्री असतांना मालाड येथील उद्यानाला ‘टिपू सुलतान’ याच्या नावाची कमान लावण्यात आली होती.

अंमलबजावणी संचालनालयाकडून महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे धाडसत्र !

आयकर विभागात होणारा भ्रष्टाचार म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यामुळे जगामध्‍ये भारताचा सन्‍मान वाढला ! – गणेश नाईक, आमदार

तप्रधानांनी अतिशय खडतर परिस्‍थितीमध्‍ये स्‍वत:चे शिक्षण पूर्ण केले; परंतु देशातील विद्यार्थ्‍यांना चांगले शिक्षण मिळावे, याची काळजी ते घेत आहेत. ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमांतर्गत पंतप्रधान विद्यार्थ्‍यांशी संवाद साधून त्‍यांच्‍या मनात आत्‍मविश्‍वासाची पेरणी करत असतात…..

‘आंतरराष्‍ट्रीय हॉलोकॉस्‍ट स्‍मृतीदिना’निमित्त मंत्रालयात ज्‍यूंच्‍या नरसंहाराचे छायाचित्र प्रदर्शन !

‘आंतरराष्‍ट्रीय हॉलोकॉस्‍ट (नरसंहार) स्‍मृतीदिना’निमित्त इस्रायलचा वाणिज्‍य दूतावास आणि महाराष्‍ट्राचा पर्यटन विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने नाझी जर्मनीकडून ज्‍यूंच्‍या झालेल्‍या नरसंहाराचे मंत्रालयात छायाचित्र प्रदर्शन लावण्‍यात आले होते.

अभिनेत्री उर्फी जावेद हिला मुंबईत भाड्याने घर देण्‍यास सर्वांचाच नकार !

तिने सांगितले, ‘‘माझ्‍या कपड्यांमुळे मुसलमान मालक मला घर भाड्याने देत नाहीत आणि मी मुसलमान आहे; म्‍हणून हिंदु मालक घर भाड्याने देत नाहीत. मला मिळणार्‍या राजकीय धमक्‍यांची काही मालकांना भीती वाटते. त्‍यामुळे मुंबईत भाड्याने जागा शोधणे अवघड आहे.’’

राज्‍यभरात शाहरूख खानच्‍या ‘पठाण’ चित्रपटास ठिकठिकाणी विरोध

शाळा-महाविद्यालये येथे राष्‍ट्रप्रेमाचे धडे न दिल्‍याने आजचे तरुण देशासमोरील समस्‍यांना वेळ देण्‍याऐवजी भारतीय संस्‍कृतीचे हनन करणार्‍या चित्रपटांचे उदात्तीकरण करत आहेत, हे दुर्दैवी आहे !