चित्रपट दिग्‍दर्शक राजकुमार संतोषी यांची मुंबई पोलिसांकडे अतिरिक्‍त सुरक्षेची मागणी !

संतोषी यांचा ‘गांधी-गोडसे : एक युद्ध’ २६ जानेवारी या दिवशी प्रसारित होणार आहे. या चित्रपटाचे प्रसारण रहित करा, अन्‍यथा परिणाम वाईट होईल, अशी धमकी मिळाल्‍याचे राजकुमार संतोषी यांनी पत्रात म्‍हटले आहे.

आय.एन्.एस्. वागीर’ पाणबुडी नौदलाच्‍या सेवेत रुजू !

पाण्‍याखालील लक्ष्याचा भेद करण्‍यासाठी पाणतीर, तर पाण्‍यावरील किंवा भूमीवरील लक्ष्याला भेदण्‍यासाठी क्षेपणास्‍त्र डागण्‍याची क्षमता या पाणबुडीत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधीमंडळाच्‍या मध्‍यवर्ती सभागृहात स्‍थापन !

गळ्‍यात रुद्राक्षांची माळ आणि खांद्यावर भगवी शाल असलेले बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र हे चित्रकार किशोर मानावडेकर यांनी साकारलेले आहे.

अनिल देशमुख यांच्‍या जामिनाच्‍या स्‍थगितीची याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळली !

महाराष्‍ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्‍या जामिनाला स्‍थगिती द्यावी, यासाठी केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणेने केलेली याचिका २३ जानेवारी या दिवशी सर्वोच्‍च न्‍यायालयाने फेटाळून लावली. देशमुख यांना मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या जामिनाला स्‍थगिती मिळावी, यासाठी केंद्रीय अन्‍वेषण यंत्रणेने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका केली होती.

मुंबईत दीड वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणार्‍या नराधमाला अटक !

समाजातील वाढती वासनांधता ! सरकारने वासनांधांना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले, तरच असे कुकृत्य करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती !

शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी युती करण्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २३ जानेवारी या दिवशी एका संयुक्त पत्रकार एकत्रित परिषद घेऊन ही घोषणा केली.

घाटकोपर (मुंबई) येथील हिंदु जनसंघर्ष मोर्च्‍यात सहभागी १ सहस्र ५०० हून अधिक हिंदूंची चेतावणी !

‘लव्‍ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ विरोधी कायदे होईपर्यंत हिंदूंचा संघर्ष चालूच राहील !

मारहाणीप्रकरणी आमदार बच्‍चू कडू यांना न्‍यायालयाकडून १५ फेब्रुवारीपर्यंत दिलासा !

अपघातामध्‍ये अपक्षचे आमदार बच्‍चू कडू यांना झालेल्‍या दुखापतीमुळे शासकीय अधिकार्‍याला मारहाण केल्‍याच्‍या प्रकरणाची सुनावणी मुंबई सत्र न्‍यायालयाने पुढे ढकलली आहे. ही सुनावणी १५ फेब्रुवारी या दिवशी होईल.

मुंबईत आजपासून ‘ई गव्‍हर्नन्‍स’ प्रादेशिक परिषदेला प्रारंभ !

केंद्रशासनाच्‍या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग अन् महाराष्‍ट्र शासन यांद्वारे २३ आणि २४ जानेवारी या दिवशी परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

आज घाटकोपर येथे हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’ आणि ‘धर्मांतर’ याविरोधात सरकारने कठोर कायदे करावेत, या एकमुखी मागणीसाठी घाटकोपर येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने आज भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे.