इयत्ता दहावी-बारावीची प्रश्‍नपत्रिका भ्रमणभाषवर पाठवल्‍यास ५ वर्षे परीक्षेला मुकणार !

मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे विद्यार्थ्‍यांवर संस्‍कार नाहीत, असे कुणाला वाटल्‍यास चूक ते काय ? शालेय अभ्‍यासक्रमात धर्मशिक्षणाचा अंतर्भाव केला असता, तर यासाठी कडक नियम करण्‍याची वेळ आली नसती !

राज्‍यातील सर्व शाळांमध्‍ये ‘आजी-आजोबा दिवस’ साजरा होणार !

सध्‍या मातृदिन, पितृदिन, महिलादिन, कन्‍यादिन, योगदिन असे विविध दिवस साजरे केले जातात. आता राज्‍यातील सर्व शाळांमध्‍ये ‘आजी-आजोबा दिवस’ साजरा केला जाणार आहे. याविषयी शासन निर्णय झाला असून त्‍याचे परिपत्रकही लागू करण्‍यात आले आहे.

एन्.आय.ए. ला ई-मेलद्वारे मुंबई येथे आक्रमण करण्याची धमकी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) ई-मेल पत्त्यावर मुंबईवर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणार्‍याने तालिबानी असल्याचा दावा केला आहे.

सोलापूर, कोल्हापूर विद्यापिठाच्या २ फेब्रुवारीपासून होणार्‍या सर्व परीक्षा स्थगित

वर्ष २०१६ पासून शिक्षकेतर कर्मचारी स्वत:च्या विविध मागण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत आहेत; मात्र शासनाकडून केवळ आश्वासनाविना काहीही मिळत नाही. प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांची हानी होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन मागे घेत होतो.

‘वंदे भारत’ एक्‍सप्रेस १० फेब्रुवारीपासून मुंबई ते शिर्डी धावणार !

यापूर्वी महाराष्‍ट्रात नागपूर ते बिलासपूर आणि मुंबई ते गांधीनगर या २ मार्गांवर ‘वंदे भारत’ एक्‍सप्रेस धावत आहेत. मुंबई ते शिर्डी हे अंतर कापण्‍यासाठी या एक्‍सप्रेसला ६ घंटे लागतील.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या ३ सहस्र ६६८ वाहनांवर कारवाई

आतापर्यंतच्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्‍यांनी जनतेला शिस्‍त न लावल्‍याचा परिणाम !

‘डी’ कंपनीच्‍या तालावर नाचणार्‍या बॉलीवूडचे हिंदुविरोधी षड्‍यंत्र उद़्‍ध्‍वस्‍त करा ! – (सेवानिवृत्त) मेजर सरस त्रिपाठी

अंतर्गत शत्रूंपैकी बॉलीवूडमधील लोक भारताच्‍या विरोधात काम करत आहेत. बॉलीवूड पूर्वीपासूनच हिंदु पुजारी, साधू, संत, तसेच ‘हिंदू’ म्‍हणून ओळख असलेल्‍या पात्रांना खलनायक म्‍हणूनच दाखवत आलेली आहे.

‘जय जय महाराष्‍ट्र माझा’ गीताला महाराष्‍ट्राच्‍या राज्‍यगीताचा दर्जा !

‘जय जय महाराष्‍ट्र माझा, गर्जा महाराष्‍ट्र माझा’ या गीताला महाराष्‍ट्र शासनाने राज्‍यगीताचा दर्जा दिला आहे. १९ फेब्रुवारीपासून ‘राज्‍यगीत’ म्‍हणून या गीताचा स्‍वीकार करण्‍यात येणार आहे.

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्‍या अध्‍यक्षपदी प्रमोद डोईफोडे, तर उपाध्‍यक्षपदी महेश पवार यांची निवड !

प्रति २ वर्षांनी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाची निवडणूक होते. नूतन अध्‍यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी ‘सर्वांना समवेत घेऊन काम करीन. पत्रकारसंघाचे काम उंचावण्‍याचा प्रयत्न करीन’, असे मनोगत व्‍यक्‍त केले.

शिवडी महानगरदंडाधिकारी न्यायालयाकडून हरभजन सिंह पसार म्हणून घोषित !

शिवडी महानगरदंडाधिकारी न्यायालयाकडून राणा यांचे वडील हरभजन सिंह कौर पसार म्हणून घोषित करण्यात आले आहे, तसेच नवनीत राणा आणि त्यांचे वडील यांना १ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.