मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची होणार ‘ड्रोन’द्वारे होणार पहाणी ! – रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

मुंबई-गोवा महामार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. मे २०२३ पर्यंत महामार्गाची एक लेन पूर्ण होईल, तर डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होईल.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोपरखैरणे सेक्टर ११ येथे पुलाचे बांधकाम चालू ! 

पावणे उड्डाणपूल आणि ब्ल्यू डायमंड हॉटेल ते कोपरी सेक्टर-२६ सिग्नल येथील वाहतूककोंडी फोडण्यासाठी महापालिकेने कोपरखैरणे सेक्टर ११ येथे नाल्यावर पुलाचे बांधकाम चालू केले आहे.

फ्रान्समध्ये शिक्षण घेणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी ! – एडोआर्ड फिलिफ, फ्रान्सचे माजी पंतप्रधान

फ्रान्समध्ये भारतातील १० सहस्र विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. भविष्यात या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी आणि भारत-फ्रान्स यांच्यातील संबंध आणखी दृढ व्हावेत, असे मत फ्रान्सचे माजी पंतप्रधान आणि ले हाव्रेचे सध्याचे महापौर एडोआर्ड फिलिफ यांनी व्यक्त केले.

गरीब रुग्णांना सवलत न देणार्‍या धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई करणार !  – डॉ. तानाजी सावंत, आरोग्यमंत्री

‘रुबी हॉल रुग्णालयातील किडनी रॅकेटमधील मुख्य आरोपी पसार आहेत. ही संघटित गुन्हेगारी असून या रॅकेटचे लोण महाराष्ट्रात पसरले आहे’, असे सौ. मिसाळ यांनी निदर्शनास आणून दिले. त्याला उत्तर देतांना डॉ. तानाजी सावंत यांनी ही घोषणा केली.

देवस्थानांच्या भूमी कसणार्‍यांच्या नावे करण्यासाठी कायदा करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

देवस्थानांच्या मालकीच्या भूमी कसणार्‍यांच्या नावे करण्यासाठी कायदा करून तो मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्मारक उभारणार ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य मंत्री

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोलाचे आहे. आपले भाग्य आहे की, असे महान पुरुष आपल्या मातीत जन्माला आले आहेत. त्यांनी ज्या भूमीतून इतिहास घडवला, अशा स्थळांचा विकास होणे आवश्यक आहे.

फ्रान्समध्ये शिक्षण घेणार्‍या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ व्हावी !

फ्रान्सचे माजी पंतप्रधान एडोआर्ड फिलिफ यांचे विधान

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या अडवून ठेवलेल्या गायींची त्वरित सुटका करावी ! – जयंत पाटील, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सर्व गाड्या कर्नाटकातील तुमकूर येथील पोलीस ठाण्यात अडवून ठेवल्या आहेत. या सर्व प्रकारात एका गायीचा मृत्यू झाला आहे.

कार्यक्रमाच्या विरोधात अंनिसकडून तक्रार प्रविष्ट !

बागेश्वर धामचे सरकार पंडित धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा मीरा रोड येथे कार्यक्रम

खासगी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी तक्रार प्राप्त होताच कारवाई करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

राज्यातील खासगी अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. अनधिकृत सावकारांच्या विरुद्ध तक्रारी प्राप्त होताच कारवाई करण्यात येत आहे.