देवस्थान आणि गायरान भूमी कसणार्यांच्या नावे, तर गायरान भूमीवरील घरे नियमित करण्यासाठी समिती गठित !
मुंबई, १८ मार्च (वार्ता.) – देवस्थानांच्या मालकीच्या भूमी कसणार्यांच्या नावे करण्यासाठी कायदा करून तो मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ मार्च या दिवशी विधानसभेत दिली.
ते म्हणाले की, वन भूमीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असून अतिक्रमणास प्रतिबंध करण्यास अपयशी ठरणार्या संबंधित अधिकार्यांवर कारवाई करावी, तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आदिवासी बंधू-भगिनी जी भूमी कसतात, त्यांच्या कह्यात असलेली ४ हेक्टरपर्यंतची वन भूमी असणार्या शेतकर्यांच्या नावे करून सातबारावर त्यांचे नाव लावणे, देवस्थान आणि गायरान भूमी कसणार्यांच्या नावे करणे, गायरान भूमीवरील घरे नियमित करणे, वनहक्क भूमींचे प्रलंबित दावे, शासकीय योजनांचा लाभ या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी सर्व संबंधित मंत्र्यांची समिती गठित करण्यात आली आहे. त्यामध्ये माजी आमदार जे.पी. गावित आणि आमदार विनोद निकोले यांना सदस्य करण्यात आले आहे. या समितीला १ मासात अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.