राज्यात राबवण्यात येणार्‍या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियाना’मध्ये ‘सुराज्य अभियाना’च्या सूचनांचा समावेश !

राज्यात राबवण्यात येत असलेल्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक अभियानामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाकडून सुचवण्यात आलेल्या सूचनांचा समावेश करण्यात आला आहे.

(म्हणे) ‘सत्ताधारी पक्ष समाजातील मुसलमान द्वेषाचा वापर अतिशय हुशारीने करत आहे !’ – अभिनेते नसीरूद्दीन शाह

इतकी वर्षे काँग्रेसने मुसलमानांचे लांगूलचालन करून मते मिळवली. धर्माच्या आधारावर लाभ मिळवला जात असतांना नसीरूद्दीन शाह यांना धर्माची आठवण कधी का झाली नाही ?

पुजार्‍यांना ‘उघडेबंब’ म्हणणारे छगन भुजबळ यांचे पाद्री, मौलवी यांच्या, तसेच मुसलमान महिलांच्या बुरख्यावर टीका करण्याचे धाडस आहे का ?

पुजार्‍यांना ‘उघडेबंब’ म्हणत हिणवण्याचे धाडस होते. मक्केतील ‘काबा’चे दर्शन घेण्यासाठी जाणारे सर्व मुसलमान पुरुष ‘पुजार्‍यांप्रमाणेच’ कमरेच्या वर वस्त्रे घालत नाहीत, त्यांना ‘अर्धनग्न’ म्हणण्याचे धाडस भुजबळ यांच्यात आहे का ?

धर्मांधाला २ वर्षे कारावास आणि ५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा !

माझगाव दंडाधिकारी न्‍यायालयाने १९ वर्षीय आरोपी रियाझ अहमद याला दोन वर्षांचा कारावास आणि ५ सहस्र रुपये दंडाची शिक्षा २७ मे या दिवशी सुनावली आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरू देशाची नागरिक असलेल्‍या महिलेचा विनयभंग केल्‍याचा रियाझवर आरोप होता.

सर्व विभागांमध्‍ये राज्‍य आपत्ती प्रतिसाद दल नियुक्‍त करावे ! – मुख्‍यमंत्री

राष्‍ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक आपत्तीच्‍या वेळी राज्‍यात प्रत्‍येक ठिकाणी वेळेत पोचू शकत नाहीत. त्‍यामुळे राज्‍यात सातही विभागांच्‍या ठिकाणी राज्‍य आपत्ती प्रतिसाद दल नियुक्‍त करावे, असा आदेश मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

(म्‍हणे) ‘आपण पुन्‍हा देशाला काही वर्षे मागे नेतो का ?, अशी चिंता वाटते !’ – शरद पवार

संसद भवनाच्‍या स्‍थळी हिंदु धर्मानुसार शास्‍त्रोक्‍त पूजन झाले. हे पवार यांना खटकल्‍यामुळे ते आता विज्ञानवादाच्‍या गप्‍पा मारत आहेत, हे सूज्ञ नागरिक जाणून आहेत  !

संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

देशाचे नवीन संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. नवीन वास्तूमध्ये लोकशाहीचे औचित्य आणि गांभीर्य टिकून राहू दे. या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली.

कोकणातील आपत्ती नियंत्रणाविषयीचे धोरण ३ दिवसांत घोषित करणार !

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती नियंत्रण धोरण राज्यशासनापुढे २९ मे या दिवशी मांडण्यात येणार असल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेची ‘ट्रॅश ब्रूम’ यंत्रणा ३ वर्षांच्या आत बंद !

भरतीच्या वेळी समुद्रातून कचरा नाल्यांमध्ये येतो, तर नाल्यांमधील कचराही वहात समुद्राला जाऊन मिळतो. झोपडपंट्टयांमधून नाल्यांमध्ये टाकला जाणार्‍या, तसेच समुद्रातून येणार्‍या कचर्‍यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, फुलांचे हार, कपडे, चपला, लाकडी सामान आदींचा समावेश असतो. हा कचरा अडवण्यासाठी वर्ष २०१८ मध्ये ही यंत्रणा वापरण्यात आली; पण तरंगता कचरा वजनाने जड असल्यामुळे ही यंत्रणा बंद पडते. त्यामुळे वरील निर्णय घेण्यात आला. 

मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासी जलवाहतूक बंद !

मांडवा अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई ही प्रवासी जलवाहतूक बंद करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद असेल.