संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

देशाचे नवीन संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. नवीन वास्तूमध्ये लोकशाहीचे औचित्य आणि गांभीर्य टिकून राहू दे. या वास्तूच्या उद्घाटन सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली.

कोकणातील आपत्ती नियंत्रणाविषयीचे धोरण ३ दिवसांत घोषित करणार !

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती नियंत्रण धोरण राज्यशासनापुढे २९ मे या दिवशी मांडण्यात येणार असल्याचे या अधिकार्‍यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेची ‘ट्रॅश ब्रूम’ यंत्रणा ३ वर्षांच्या आत बंद !

भरतीच्या वेळी समुद्रातून कचरा नाल्यांमध्ये येतो, तर नाल्यांमधील कचराही वहात समुद्राला जाऊन मिळतो. झोपडपंट्टयांमधून नाल्यांमध्ये टाकला जाणार्‍या, तसेच समुद्रातून येणार्‍या कचर्‍यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिकच्या वस्तू, फुलांचे हार, कपडे, चपला, लाकडी सामान आदींचा समावेश असतो. हा कचरा अडवण्यासाठी वर्ष २०१८ मध्ये ही यंत्रणा वापरण्यात आली; पण तरंगता कचरा वजनाने जड असल्यामुळे ही यंत्रणा बंद पडते. त्यामुळे वरील निर्णय घेण्यात आला. 

मांडवा ते गेटवे ऑफ इंडिया प्रवासी जलवाहतूक बंद !

मांडवा अलिबाग ते गेटवे ऑफ इंडिया मुंबई ही प्रवासी जलवाहतूक बंद करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद असेल.

मुंबई महापालिकेचा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमूर्तींवरील बंदीचा निर्णय मान्य नाही ! – आमदार आशिष शेलार, अध्यक्ष, भाजप

मुंबई महानगरपालिकेने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमूर्तींवर बंदी घालण्याचा घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. गणेशोत्सव हा मुंबईतील महत्त्वाचा मोठा पारंपरिक उत्सव आहे.

राज्याभिषेकदिनी रायगडावरील शिवरायांच्या पुतळ्यावर १ सहस्र १०८ ठिकाणच्या जलाने होणार अभिषेक !

रायगडावर २ जून या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० व्या राज्याभिषेक साजरा होत आहे.

गणेशोत्सवातून लोकमान्य टिळक यांचा हेतू साध्य होण्यासाठी जनजागृती करूया ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्यांनी हिंदूंचे संघटन केले. हा उद्देश गणेशोत्सव मंडळांनी लक्षात घ्यावा !

जुलैमध्ये प्रदर्शित होणार ‘अजमेर ९२’ चित्रपट !

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटांतून हिंदूंवरील धर्मांध अन् जिहादी आतंकवाद्यांचे अत्याचार जगासमोर आणल्यानंतर आता ‘अजमेर ९२’ हा चित्रपट येत्या जुलै मासामध्ये प्रदर्शित होणार आहे.

राज्यातील भात पिकाच्या उत्पादनात वाढ, तर उसाच्या उत्पादनात घट !

भाताची उत्पादकता मागील वर्षाच्या तुलनेत १८.४ टक्क्यांनी वाढली आहे. उसाचे उत्पादनक्षेत्र न्यून झाले, तरी मागील वर्षीच्या तुलनेत ती ६.३ टक्क्यांनी वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट

अनंत करमुसे यांच्यावर आक्रमण केल्याच्या प्रकरणाी राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाणे पोलिसांनी पुरवणी आरोपपत्र ठाणे न्यायालयात प्रविष्ट केले.