दहावीचा निकाल ९३.८३ टक्के !

कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.११ टक्के निकाल : दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ सहस्र २५६ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी १५ लाख २९ सहस्र ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यांतील १४ लाख ३४ सहस्र ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यभरातील ५ सहस्र ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.

नवी मुंबईत आर्.टी.ई. अंतर्गत पहिल्‍या सोडतीत १ सहस्र ५०९ विद्यार्थ्‍यांनी प्रवेश घेतला !

बालकांचा विनामूल्‍य आणि सक्‍तीचा शिक्षणाचा हक्‍क अधिनियम २००९ अन्‍वये प्रतीवर्षीप्रमाणे २५ टक्‍के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्‍यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्‍यात येते.

रायगडावरील ‘गाईड्‌स’ना शिवसेनेकडून दिले जाणार आरोग्‍य विम्‍याचे संरक्षण !

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वर्षानुवर्षे सांगणार्‍या २२ गाईड्‍सना वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्षाच्‍या वतीने वार्षिक ५ लाख रुपयांचे आरोग्‍य विम्‍याचे संरक्षण दिले जाणार आहे.

उद्या इयत्ता दहावीचा निकाल !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार २ जून या दिवशी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. २ जूनला दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पहाता येईल.

#Exclusive : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रथमच दिव्यांग आणि वृद्ध यांना घरबसल्या मतदान करता येणार !

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अशा प्रकारे प्रथमच प्रयोग केला जात आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली.

शाळांमध्‍ये पहिल्‍याच दिवशी पाठ्यपुस्‍तके मिळणार, १ कोटी ७ लाख विद्यार्थ्‍यांना होणार वाटप !

शिक्षणाच्‍या नवीन धोरणानुसार इयत्ता १ ते ८ वीच्‍या सर्व विद्यार्थ्‍यांना विनामूल्‍य पाठ्यपुस्‍तके देण्‍यात येणार आहेत. या वर्षी ४ लाख २९ सहस्र पाठ्यपुस्‍तकांची छपाई करण्‍यात आली आहे.

प्रत्‍येक विद्यार्थ्‍याला ३०० रुपयांचा एक गणवेश शाळेच्‍या पहिल्‍या दिवशी देणार !

प्रत्‍येक विद्यार्थ्‍याला ३०० रुपये किमतीचा एक गणवेश शाळा व्‍यवस्‍थापन समितीच्‍या माध्‍यमातून शाळेच्‍या पहिल्‍या दिवशी उपलब्‍ध करून देण्‍याचे सूचित करण्‍यात आले आहे.

राज्‍यात ‘स्‍वच्‍छ मुख अभियाना’साठी सदिच्‍छादूत म्‍हणून सचिन तेंडुलकर यांची नियुक्‍ती !

वाढत्‍या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्‍यासाठी राष्‍ट्रीय मौखिक आरोग्‍य कार्यक्रमांतर्गत मौखिक आरोग्‍यासाठी ‘ओरल हेल्‍थ पॉलिसी’ आणण्‍यासाठी शासन सकारात्‍मक असून लवकरच यासंदर्भात नवीन धोरण सिद्ध करण्‍यात येणार आहे.

मुंबई येथे घातपाताच्‍या शक्‍यतेने ११ जूनपर्यंत कठोर निर्बंध लागू !

येथे २८ मे ते ११ जून या कालावधीत कठोर निर्बंध लावण्‍याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्‍यात आले आहेत. उपायुक्‍त विशाल ठाकूर यांनी हे आदेश पत्राद्वारे काढले असून त्‍यांची माहिती शहरातील शेवटच्‍या व्‍यक्‍तीपर्यंत विविध माध्‍यमांतून पोचवण्‍याचे आवाहन त्‍यांनी केले आहे.

राज्‍यातील ५५ सहस्र ७९७ कर्तबगार महिलांचा सन्‍मान करणार ! – मंगलप्रभात लोढा, मंत्री, महिला आणि बाल विकासमंत्री

पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर यांच्‍या जयंतीनिमित्त राज्‍यशासन राज्‍यातील २७ सहस्र ८९७ ग्रामपंचायतींमधील ५५ सहस्र ७९७ कर्तबगार महिलांचा सन्‍मान करणार आहे, अशी माहिती महिला आणि बाल विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.