(म्हणे) ‘सत्ताधारी पक्ष समाजातील मुसलमान द्वेषाचा वापर अतिशय हुशारीने करत आहे !’ – अभिनेते नसीरूद्दीन शाह

अभिनेते नसीरूद्दीन शाह

मुंबई – सध्याचा काळ खरोखर चिंताजनक आहे. सध्या ‘मुसलमानांचा द्वेष’ ही अगदी सुशिक्षित लोकांमध्येही ‘फॅशन’ झाली आहे. (खोटे बोल पण रेटून बोल’, या वृत्तीचे शाह ! या देशात हिंदुद्वेष ही खर्‍या अर्थाने ‘फॅशन’ बनली आहे, हे कुणीही सांगेल ! – संपादक) सत्ताधारी पक्ष याचा अतिशय हुशारीने वापर करत आहे, अशी गरळओक अभिनेते नसीरूद्दीन शाह यांनी केली. ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

यामध्ये नसीरूद्दीन शाह यांनी म्हटले आहे की, आम्ही (मुसलमान) धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांविषयी बोलतो, मग तुम्ही प्रत्येक गोष्टीत धर्म का आणता ? ‘इस्लाद्वेषाचा’चा उपयोग केवळ निवडणुकीत मते मिळवण्यासाठी केला जात आहे.  समाजात चुकीची माहिती पसरवण्यासाठी काही चित्रपट आणि कार्यक्रम यांचा साधन म्हणून वापरला केला जात आहे. मते मिळवण्यासाठी धर्माचा वापर करणार्‍या राजकारण्यांसाठी निवडणूक आयोग मूकप्रेक्षक बनला आहे. (निवडणूक आयोगावर अशी टीका करणे कायद्यात बसते का ? अशांवर निवडणूक आयोग कारवाई करणार का ? – संपादक)

एखाद्या मुसलमान नेत्याने ‘अल्ला हू अकबर’ म्हणत मते मागितली असती, तर किती मोठा गोंधळ झाला असता ? लोकांमध्ये फूट पाडणारे हे धर्माचे सूत्र एके दिवशी निघून जाईल, अशी आशा आहे. पंतप्रधान लोकांपुढे जाऊन अशा गोष्टी बोलतात आणि तरीही ते हरतात. त्यामुळे मला आशा आहे की, राजकारणात धर्माचा प्रभाव बंद होईल; पण सध्या तरी मुसलमानद्वेष चालू आहे. या शासनाने हुशारीने ही खेळी खेळली आहे. (इतकी वर्षे काँग्रेसने मुसलमानांचे लांगूलचालन करून मते मिळवली. धर्माच्या आधारावर लाभ मिळवला जात असतांना नसीरूद्दीन शाह यांना धर्माची आठवण कधी का झाली नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • जगातील एकाही मुसलमान देशात मिळत नाहीत, एवढ्या सुविधांचा भारतात ‘अल्पसंख्यांक’ म्हणून नित्य उपभोग घेऊनही हिंदूंचा द्वेष करणारे मुसलमान !
  • किती हिंदु कलाकार हिंदूंवरील लव्ह जिहाद, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या, धार्मिक मिरवणुकांवरील आक्रमणे आदी आघातांच्या विरोधात आवाज उठवतात ?