
(‘सेझ’ म्हणजे ‘स्पेशल इकॉनॉमिक झोन’ म्हणजे विशेष आर्थिक क्षेत्र)
दादर-पेण (जिल्हा रायगड) – येथील ग्रामस्थांनी शेतभूमींचे सातबारे शेतकर्यांच्या नावे करण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला होता.
विशेष आर्थिक क्षेत्र निर्माण करण्याच्या नावाखाली ‘रिलायन्स (सेझ)’ आस्थापनाने भूसंपादन केलेल्या शेतकर्यांना दिलेल्या कोणत्याही अटी आणि आश्वासने यांचे पालन केले नाही. भूसंपादनाच्या १८ वर्षांनंतरही कोणताही उद्योग या आस्थापनाने निर्माण केला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. या कारणास्तव ‘आमचा सातबारा कोरा करा आणि ‘पेण ग्रोथ सेंटर’मध्ये तिसर्या मुंबईमध्ये दादर गावाचा समावेश करा’, अशी मागणी घेऊन शेतकर्यांनी हा मोर्चा काढला.
मोर्चाच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे उपस्थित होते. ‘शेतकर्यांची ही मागणी रास्त आहे’, असे ते या वेळी म्हणाले. या विषयासंदर्भात जिल्हाधिकार्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश
अनुमतीविना म्हादई वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्या ५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा नोंद
‘स्मार्ट मीटर’विषयीच्या अफवांवर विश्वास न ठेवता ग्राहकांनी सहकार्य करावे ! – महावितरणचे आवाहन
Ayushman Bharat Yojana : आयुष्मान भारत योजने’च्या अंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतचे उपचार विनामूल्य करण्याची संसदीय समितीची शिफारस
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !