
ठाणे, १७ मार्च (वार्ता.) – देहली येथील तरुण खाटीक हत्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी उल्हासनगरमध्ये १५ मार्चला सकल हिंदु समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार शांतीनगर, उल्हासनगर क्र. ३ येथून निघाला. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून स्वामी विवेकानंद चौक आणि डॉ. भीमराव आंबेडकर चौक येथून परत छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार शांतीनगर, उल्हासनगर क्र.३, येथे मोर्चाची सांगता झाली.
मोर्चामध्ये सहभागी नागरिकांनी हातात भगवे झेंडे आणि मशाली घेतल्या होत्या. ‘तरुण खाटीक हम शर्मिंदा हैं, तेरे कातिल जिंदा है ।’, ‘फाशी दो, फाशी दो, हत्यारों को फाशी दो’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि ‘हर हर महादेव’, अशा घोषणा देण्यात आल्या. मोर्चात महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
या मोर्चाचे आयोजन ‘हिंदु जोडो यात्रा समिती भारतवर्ष’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अनिल जयस्वाल यांनी केले होते. मोर्चामध्ये अखिल भारतीय नवयुग संघाचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष श्री. नितीन चंडालिया, राष्ट्रीय छावा संघटनेचे अध्यक्ष श्री. निखिल गोळे, जय महाराष्ट्र मित्र मंडळचे पदाधिकारी श्री. अशोक श्रीवास्तव, तसेच हिंदुत्वनिष्ठ श्री. आशिष शर्मा, तसेच हिंदु जनजागृती समितीकडून श्री. उल्हास चौधरी आणि श्री. वीरेश अहिर हे सहभागी झाले होते.
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त