
नांदेड – कर्तव्यदक्ष आणि धडाडीच्या कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांचे ‘दिव्यांग कल्याण विभाग’ सचिव पदावरून केलेले स्थानांतर त्वरित रहित करावे, या मागणीसाठी ८ एप्रिल या दिवशी येथे दिव्यांग बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. दिव्यांगांनी ‘तुकाराम मुंढे यांचे स्थानांतर रहित झालेच पाहिजे’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
राज्य सरकारने तुकाराम मुंढे यांचे आपत्ती व्यवस्थापन विभागात स्थानांतर केले आहे. दिव्यांग विभागाचे सचिव म्हणून काम करतांना मुंढे यांनी अनेक लोकहितवादी निर्णय घेतले होते. त्यांच्या कार्यकाळात दिव्यांग बांधवांना न्याय मिळत होता. जिल्हाधिकारी कार्यालयात विधीमंडळ अंदाज समितीची महत्त्वाची बैठक चालू असतांनाच हे आंदोलन करण्यात आले. आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहून प्रशासनाने परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मंत्रालयातील आंदोलनानंतर आता राज्याच्या इतर भागांतही वरील मागणी करण्यात येत आहे.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !
‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन
पुणे महानगरपालिकेत बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमांतून आर्थिक फसवणूक !
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !