रिकामे गॅस सिलिंडर घेऊन तहसील कार्यालयावर काढला मोर्चा

कुडाळ – आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात घरगुती (एल्.पी.जी.) गॅसची टंचाई जाणवू लागली आहे. याचा परिणाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जाणवत असून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरची कमतरता भासू लागल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत, तर घरगुती गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या गॅस वितरक केंद्रांवर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. ‘ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेतही अनेक अडचणी निर्माण होत असल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे’, असा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. या पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयावर रिकामे सिलिंडर घेऊन मोर्चा काढला. या वेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. गॅसटंचाईच्या समस्येवर २ दिवसांत सकारात्मक निर्णय न झाल्यास १७ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हात सर्वत्र तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी माजी आमदार नाईक यांनी या वेळी दिली.
या वेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, जिल्हा परिषद सदस्य रूपेश पावसकर आणि गंगाराम सडवेलकर, अतुल बंगे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखीचे नेत्रदीपक रिंगण !
आज मराठी शाळांसाठी मराठी अभ्यास केंद्राची बैठक !
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना ३ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी !
‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार ! – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन
पुणे महानगरपालिकेत बनावट नियुक्तीपत्रांच्या माध्यमांतून आर्थिक फसवणूक !
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !