जनतेच्या आरोग्याची किंमत शून्य असणारे सरकार !

‘केंद्र सरकारद्वारे ३४४ औषधे प्रतिबंधित केली गेली आहेत; परंतु अजूनही अनेक ठिकाणी अशा औषधांची सर्रास विक्री केली जात असल्याचे लक्षात येते. १२.१२.२०२० या दिवशी राजस्थानमध्ये १ कोटी रुपयांच्या प्रतिबंधित औषधांची विक्री झाल्याचे आढळले.’

बनावट कागदपत्रांच्या आधारे २५ सहस्र आरोपींना जामीन

शहरात बनावट कागदपत्रांच्या आधारे जामीन मिळवून देणारी टोळी पुणे पोलिसांनी उघडकीस आणली आहे. शिवाजीनगरसह वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून ७ गुन्हे नोंद करत ३७ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

जिल्हा पोलीस मुख्यालय परिसरातील पथदीप दिवसाही चालूच !

पोलीस मुख्यालयाच्या पूर्वेच्या दगडी भिंतीला एक पथदीप बसवण्यात आला आहे. हा पथदीप दिवसा-उजेडी चालू असून त्याकडे पोलीस दलातील सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

व्यापार्‍याकडून फसवणूक झाल्याने अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकर्‍याची आत्महत्या

विकलेल्या संत्राच्या बागेचे पैसे मागण्यासाठी शेतकरी शेतात गेला असता व्यापार्‍याने त्याला मद्य पाजून मारहाण केली.

हिंगोली जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मुख्यमंत्र्याच्या नावे पाठवले १ सहस्र ८०० रुपयांचे धनादेश

पीक विम्याची हास्यास्पद हानीभरपाई !

यवतमाळ पोलिसांकडून ५०० पेट्या मद्यसाठा जप्त !

ट्रकने आलेला ५०० पेट्या मद्यसाठा पोलिसांच्या सहकार्याने जिल्ह्यात आला असल्याची चर्चा प्रसिद्धी माध्यमात आहे.

ओडिशातील प्राचीन दक्षेश्‍वर मंदिरातील २२ मौल्यवान मूर्तींची चोरी

पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असणार्‍या मंदिरात मूर्तींची चोरी होते, यावरून पुरातत्व विभागाचा कारभार लक्षात येतो ? असला विभाग हवा कशाला ?

वेंगुर्ला शहरात चालू असलेल्या भूमीगत वीजवाहिन्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडी

भूमीगत वीजवाहिन्या टाकण्यासाठी शहरातील सर्वच रस्ते खोदण्यात आले आहेत, तसेच ठेकेदार आपल्या मनप्रमाणे रस्त्यांचे खोदकाम करत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्पबाधितांचे प्रश्‍न त्वरित न सुटल्यास टोकाची भूमिका घ्यावी लागेल ! – आमदार नितेश राणे यांची प्रशासनाला चेतावणी

तिलारी धरण, अरुणा धरण प्रकल्प या सर्व ठिकाणच्या प्रकल्पबाधितांचे प्रश्‍न गेली कित्येक वर्षे सुटलेले नाहीत, तर ५ वर्षांमागील प्रकल्पबाधितांचे प्रश्‍न काय सुटणार ?

तेरवाड (जिल्हा कोल्हापूर) बंधार्‍यावर सहस्रो मासे मृतावस्थेत आढळल्याने नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना बांधून ठेवले

इचलकरंजी नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश