व्यापार्‍याकडून फसवणूक झाल्याने अमरावती जिल्ह्यात संत्रा उत्पादक शेतकर्‍याची आत्महत्या

शेतकर्‍यांसह सर्व जनता सुखी होण्यासाठी आदर्श राज्य हवे !

अमरावती, २५ डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात असलेल्या धनेगावातील अशोक भुयार (वय ५० वर्षे) या संत्रा उत्पादक शेतकर्‍याने व्यापार्‍याकडून फसवणूक झाल्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. विकलेल्या संत्राच्या बागेचे पैसे मागण्यासाठी शेतकरी शेतात गेला असता व्यापार्‍याने त्याला मद्य पाजून मारहाण केली. या घटनेची तक्रार देण्यासाठी शेतकरी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात गेला असता ठाणेदार आणि बीट जमादार यांनीही या शेतकर्‍याला मारहाण केली असल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे ही चिठ्ठी लिहून त्याने न्यायाची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच गावकर्‍यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत संबंधित ठाणेदार आणि बीट जमादार यांच्या स्थानांतराची (बदलीची) मागणी केली