पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असणार्या मंदिरात मूर्तींची चोरी होते, यावरून पुरातत्व विभागाचा कारभार लक्षात येतो ? असला विभाग हवा कशाला ?
भुवनेश्वर (ओडिशा) – ओडिशाच्या खुरधा जिल्ह्यातील बानपूर येथील प्राचीन आणि ऐतिहासिक असणार्या दक्षेश्वर मंदिरात झालेल्या चोरीमध्ये चोरट्यांनी २२ प्राचीन मूर्ती पळवल्या आहेत. या सर्व मूर्ती अष्टधातूंपासून बनल्या आहेत. यात कनक दुर्गा, गोपीनाथ देव, कलियुगेश्वर देव, चंद्रशेखर देव आदींचा समावेश आहे. या कोट्यवधी रुपये मूल्याच्या मूर्ती आहेत. या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. हे मंदिर पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येते.
In Odisha, 22 rare idols stolen from 13th century Shiva temple
(report by @debabrata2008)https://t.co/C2ry1PFfRO pic.twitter.com/yLjwuedMJK
— Hindustan Times (@htTweets) December 22, 2020
चोरट्यांनी रात्री मंदिराचे मुख्य द्वार तोडून आता प्रवेश केला. सकाळी पुजारी मंदिरात आले तेव्हा त्यांना ही गोष्ट लक्षात आली. या मंदिरात एकूण ३१ मूर्ती होत्या, त्यांतील २२ चोरण्यात आल्या.