शुद्धलेखनाच्या चुका टाळल्याने लिखाणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मकता वाढते !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

फरिदाबाद (हरियाणा) येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘नैतिक मूल्य आणि गुणसंवर्धन’ या विषयावर प्रवचन

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने येथील एस्.जी.एम्. नगरमधील ‘नेहा पब्लिक स्कूल’मध्ये ‘नैतिक मूल्य आणि गुणसंवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे ‘संगीतातून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावरील अमूल्य मार्गदर्शन !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कलाकारांना ‘संगीतातून ईश्वरप्राप्तीसाठी साधना’ या विषयावर केलेल्या मार्गदर्शनाचा लाभ ‘संगीतातून साधना करू इच्छिणार्‍या व्यक्तींना व्हावा’, या दृष्टीने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली मार्गदर्शनपर सूत्रे येथे दिली आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आलेल्या ‘ब्रह्मोत्सव’ संदर्भातील संशोधन !

महर्षींच्या आज्ञेने ११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी, गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचा ‘ब्रह्मोत्सव’ साजरा करण्यात आला. यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’या उपकरणाद्वारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन करण्यात आले आहे…

सनातनच्या ३ गुरूंनी ब्रह्मोत्सवात परिधान केलेल्या वस्त्रालंकारांमध्ये विलक्षण चैतन्य निर्माण होणे !

ब्रह्मोत्सवापूर्वी वस्त्रालंकारांमध्ये १.५ ते ३.३ सहस्र मीटर सकारात्मक ऊर्जा होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी हे वस्त्रालंकार ब्रह्मोत्सवात परिधान केल्यानंतर त्यांतील सकारात्मक ऊर्जा ४२ सहस्र ते १ लक्ष मीटरपेक्षाही अधिक झाली…

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या संकल्पाने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत चालू केलेल्या ‘संगीताच्या माध्यमातून साधना’, याविषयी उत्तरोत्तर वाढत गेलेले कार्य !

वर्ष २०१७ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या वेळी त्यांनी ‘आज महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या अंतर्गत संगीताच्या माध्यमातून साधना करण्यासाठी ‘संगीताशी संबंधित कार्य चालू केले आहे’, असे सांगितले होते.

‘देव भावाचा भुकेला आहे’, या उक्तीनुसार मंदिरात देवतेचे दर्शन घेतांना व्यक्तीच्या देवाप्रती असलेल्या भावानुसार तिला चैतन्य ग्रहण होते !

‘व्यक्तीने मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्यापूर्वी आणि घेतल्यानंतर तिच्या सूक्ष्म-ऊर्जेवर (‘ऑरा’वर) काय परिणाम होतो ?’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी करण्यात आलेल्या चाचणीचे निष्कर्ष येथे देत आहे.

चैतन्याचा स्रोत असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे परमपावन जन्मस्थान !

श्रीगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) परमपावन जन्मस्थानाच्या संदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘यू.ए.एस्.’ हे उपकरण आणि लोलक यांच्याद्वारे आध्यात्मिक संशोधन करण्यात आले. या दोन्ही उपकरणांद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते, हे संशोधन पुढे दिले आहे.

कलाकारांनो, कला ईश्वरप्राप्तीसाठी असल्याने कला शास्त्रशुद्ध, सात्त्विक पद्धतीने आणि भावपूर्णपणे सादर करून ईश्वराचा आशीर्वाद मिळवा !

. . . परंतु अशा कार्यक्रमांचे आयोजन करून कलेचा अपमान करणार्‍यांना देव क्षमा करणार नाही. कलेची जपणूक करण्याच्या समवेतच ‘कलेचा कुणी अपमान करत असेल, तर त्यात वाहवत न जाता त्याला विरोध करणे’, हे कलाकाराचे प्रथम कर्तव्य आहे.

भारतीय शास्त्रीय नृत्याचे आध्यात्मिक महत्त्व जाणा !

चित्रकला, संगीत, नृत्य आदी सर्व कलांची निर्मिती ईश्वरापासून झाली आहे. त्यामुळे ईश्वराची अनुभूती घेता येणे, हे या सर्व कलांचे अंतिम साध्य आहे. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने या संदर्भात विपुल संशोधन करण्यात आले आहे.