फरिदाबाद (हरियाणा) – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने येथील एस्.जी.एम्. नगरमधील ‘नेहा पब्लिक स्कूल’मध्ये ‘नैतिक मूल्य आणि गुणसंवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे साधक श्री. गुलशन किंगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ १०५ हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. या वेळी ‘देशाचे आदर्श नागरिक बनण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तीमत्त्व विकास आणि गुणसंवर्धन कसे करावे?’, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी खनेजा यांनी ‘कार्यक्रम आवडला’, असे सांगून ‘असे कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये नियमित घेण्यात यावेत’, अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले, ‘कार्यक्रमात अतिशय चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्यानुसार आम्ही आचरण करण्याचा प्रयत्न करू.’