चैतन्याचा स्रोत असणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे परमपावन जन्मस्थान !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘संतांचे जन्मस्थान हे चैतन्याचा स्रोत असते. त्यामुळे संतांचे जन्मस्थान जतन करण्याची भारताची प्राचीन परंपरा आहे. सनातन धर्माचा प्रसार अखिल विश्वात करणारे आणि विश्वकल्याणासाठी अविरत झटणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या नागोठणे (जिल्हा रायगड, महाराष्ट्र) येथील जन्मस्थानाकडे जाणार्‍या मार्गाला ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मार्ग’ असे नामकरण करून नागोठणे ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर आणि मान्यवर यांच्या शुभहस्ते १२.५.२०२३ या दिवशी या मार्गाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. उद्या १२.५.२०२४ या दिवशी या अनावरण सोहळ्याला १ वर्ष पूर्ण होत आहे.

श्रीगुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) परमपावन जन्मस्थानाच्या संदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘यू.ए.एस्.’ हे उपकरण आणि लोलक यांच्याद्वारे आध्यात्मिक संशोधन करण्यात आले. या दोन्ही उपकरणांद्वारे वस्तू, वास्तू आणि व्यक्ती यांच्यातील नकारात्मक अन् सकारात्मक ऊर्जा मोजता येते. हे संशोधन पुढे दिले आहे.


१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मस्थानाशी संबंधित सर्वच घटकांमध्ये पुष्कळ प्रमाणात चैतन्य असणे

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले मार्ग’ असा लावलेला फलक

श्रीगुरूंचे जन्मस्थान (घर) आणि तेथील वातावरण (माती, पाणी अन् वायूमंडल), तसेच घराच्या परिसरातील पुष्पे अन् वृक्ष या सर्वांमध्ये नकारात्मक ऊर्जा काहीच नसून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या घरावर लावलेला नामफलक, तसेच मार्गावरील नामफलक यांचे अनावरण झाल्यानंतर त्यांतून (नामफलकांमधून) वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित झाले. हे पुढे दिलेल्या नोंदींतून लक्षात येते.

‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करताना श्री. आशिष सावंत

टीप – ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे काही घटकांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २३३७ मीटरपेक्षा अधिक आहे; पण ती अचूक मोजण्यासाठी चाचणीस्थळी जागा अपुरी पडली. त्यामुळे ती अचूक मोजण्यासाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला.

२. चाचणीतील घटकांच्या नोंदींचे विश्लेषण

सौ. मधुरा कर्वे

२ अ. दोन्ही नामफलकांमध्ये आरंभीही सकारात्मक ऊर्जा असणे आणि अनावरणानंतर त्यांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ होणे : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या अध्यात्मातील सिद्धांतानुसार जेथे संतांचे नाम (नाव) आहे, तेथे त्यांची शक्ती (चैतन्य) आहे. दोन्ही नामफलकांवर श्रीगुरूंचे नाव असल्याने त्यांच्यामध्ये आरंभीही (अनावरणापूर्वीही) श्रीगुरूंचे चैतन्य सामावले होते. संतांनी (सद्गुरु अनुराधा वाडकर यांनी) नामफलकांचे अनावरण अत्यंत भावपूर्ण केले. यामुळे नामफलकांच्या माध्यमातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे चैतन्य कार्यरत होऊन ते मोठ्या प्रमाणात वातावरणात प्रक्षेपित झाले.

२ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मस्थानाशी संबंधित सर्व घटकांमध्ये पुष्कळ चैतन्य असणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जन्मस्थान आणि तेथील वातावरण चैतन्याने भारित झाले आहे. त्यामुळे घरातील माती, पाणी, वायूमंडल, तसेच घराच्या परिसरातील तुळस, पुष्पे आणि वृक्ष या सर्वांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. ‘पुढील अनेक पिढ्यांना या चैतन्याचा लाभ व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे जन्मस्थान जतन करण्यात येत आहे. या संशोधनातून संतांचे जन्मस्थान जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित होते.’

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.४.२०२४)

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.