सनातनच्या ३ गुरूंनी ब्रह्मोत्सवात परिधान केलेल्या वस्त्रालंकारांमध्ये विलक्षण चैतन्य निर्माण होणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त साजरा करण्यात आलेल्या ‘ब्रह्मोत्सव’ संदर्भातील संशोधन !

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सप्तर्षींच्या आज्ञेनुसार वर्ष २०१५ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे. महर्षींच्या आज्ञेने ११.५.२०२३ या दिवशी फर्मागुडी, गोवा येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांचा ‘ब्रह्मोत्सव’ साजरा करण्यात आला. यासंदर्भात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’या उपकरणाद्वारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनापैकी सनातनच्या ३ गुरूंनी ब्रह्मोत्सवात परिधान केलेल्या वस्त्रालंकारांमध्ये विलक्षण चैतन्य निर्माण होणे, याविषयीचे संशोधन येथे दिले आहे. त्याचप्रमाणे यापुढील पृष्ठ ७ वर ‘३ गुरु रथात विराजमान झाल्यावर रथातील चैतन्यात आणि ब्रह्मोत्सवातील चैतन्यामुळे ३ गुरूंमधील चैतन्यात पुष्कळ वाढ’ झाल्याविषयीचे संशोधन दिले आहे.

‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करताना श्री. आशिष सावंत

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ब्रह्मोत्सवात परिधान केलेल्या वस्त्रालंकारांमध्ये विलक्षण चैतन्य निर्माण होणे

सौ. मधुरा कर्वे

ब्रह्मोत्सवापूर्वी वस्त्रालंकारांमध्ये १.५ ते ३.३ सहस्र मीटर सकारात्मक ऊर्जा होती. परात्पर गुरु डॉक्टरांनी हे वस्त्रालंकार ब्रह्मोत्सवात परिधान केल्यानंतर त्यांतील सकारात्मक ऊर्जा ४२ सहस्र ते १ लक्ष मीटरपेक्षाही अधिक झाली. हे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे. मागील वर्षी (मे २०२२ मध्ये) परात्पर गुरु डॉक्टरांनी जन्मोत्सवात परिधान केलेल्या वस्त्रालंकारांमध्ये अधिकाधिक २८६१ मीटर सकारात्मक ऊर्जा आढळून आली होती; पण यावर्षी (मे २०२३ मध्ये) मात्र वस्त्रालंकारांमध्ये अधिकाधिक १,१६,९०० मीटर एवढी प्रचंड सकारात्मक ऊर्जा आढळून आली. यातून ‘श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉक्टरांचा ‘ब्रह्मोत्सव’ सोहळा हा असामान्य अन् अद्वितीय असा दैवी सोहळा होता’, हे लक्षात येते.

२. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी ब्रह्मोत्सवात परिधान केलेल्या वस्त्रालंकारांमध्ये पुष्कळ चैतन्य निर्माण होणे

श्री महालक्ष्मीस्वरूप सद्गुरुद्वयींनी ब्रह्मोत्सवात परिधान केलेल्या वस्त्रालंकारांमध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे लक्षात आले.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ब्रह्मोत्सवात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना प्रदान केलेले ‘उत्तराधिकार पत्र’ चैतन्याने भारित होणे

परात्पर गुरु डॉक्टरांच्या दैवी चैतन्यमय हस्तस्पर्शाने ‘उत्तराधिकार पत्र’ भारित झाल्याने त्यातील सकारात्मक ऊर्जेत अनेक पटींनी वाढ झाली.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना धातूवर कोरलेले उत्तराधिकार पत्र प्रदान करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना धातूवर कोरलेले उत्तराधिकार पत्र प्रदान करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.७.२०२३) इ-मेल : [email protected]

वाचकांसाठी सूचना : या लेखात दिलेल्या सारण्यांत काही घटकांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’या उपकरणाद्वारे मोजतांना ती २,३३७ मीटरपेक्षाही अधिक होती; पण ती पूर्ण मोजण्यासाठी पुढे जाणे जागेच्या अभावामुळे शक्य नव्हते. त्यामुळे त्या घटकांतील सकारात्मक ऊर्जा अचूक मोजण्यासाठी ती लोलकाने मोजण्यात आली.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’

या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.