Education Mother Tongue:वाचनाने आपण घडतो, अन् समाज घडवू शकतो ! – चंद्रकांत सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी
वेस पालटली की, भाषा पालटते. भाषेत भिन्नता असली, तरी भारतीय संस्कृती एक आहे. नाटक, संगीत, साहित्य यांमधून विविध भाषांची गोडी लावता येईल.
वेस पालटली की, भाषा पालटते. भाषेत भिन्नता असली, तरी भारतीय संस्कृती एक आहे. नाटक, संगीत, साहित्य यांमधून विविध भाषांची गोडी लावता येईल.
संसारकटुवृक्षस्य द्वे फले ह्ममृतोपमे।
सुभाषितरसास्वादः संगतिः सुजनैः सह॥
अर्थ : संसाररूपी कटु वृक्षाची दोनच फळे अमृतासम आहेत. एक सुभाषितांचा रसास्वाद आणि दुसरे सज्जनांची संगती !
ॐ कोन न याति वशं लोके मुखे पिण्डेन पूरितः।
मृदङ्गो मुखलेपेन करोति मधुरध्वनिम्।।
अर्थ : या जगात (पैसे) खाऊ घातल्यावर कोण आपलेसे होत नाही ? मृदुंगसुद्धा कातडीच्या मध्यावर कणकेचा गोळा चिकटवल्यावर (आपल्याला हवा तसा) गोड गोड ध्वनी काढू लागतो.
संस्कृत भारती गोवा आणि सरकारचे राजभाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांखळी येथे आयोजित ‘गीतामृतम्’ या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक यांचा मोठा प्रतिसाद ! एकूण २७ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग !
विद्याधन भारभूत, म्हणजे जड होत नाही. ते खर्च कराल तेवढे वाढत जाते. असे हे विद्याधन सर्व धनांत श्रेष्ठ आहे.
ज्याचे मन संतुष्ट आहे, त्याच्याकडेच खरी संपत्ती आहे. ज्याने पायात पादत्राण घातले आहे, त्याच्या दृष्टीने जणू सर्व पृथ्वीच चामड्याने झाकलेली आहे….
दुर्जनाशी मैत्री, तसेच प्रेम करू नये. कोळसा फुललेला असला, तर जाळतो, तसेच तो थंड असला, तरी निदान हात तरी काळा करतोच.
दुसर्याचे कल्याण करण्यात मग्न असलेला सज्जन माणूस स्वतःचा विनाश जवळ आला, तरी दुसर्याशी शत्रुत्व धरत नाही. चंदन वृक्षाला तोडत असतांना सुद्धा ते वृक्ष कुर्हाडीचे पाते सुगंधित करते.
संकट येण्यापूर्वीच त्याच्या प्रतिकाराची सिद्धता करून ठेवावी. घराला आग लागल्यावर ती आग विझवण्यासाठी पाणी हवे; म्हणून विहीर खणणे योग्य नाही.
उद्या कुणाचे काय होईल, हे कुणालाही कळत नाही; म्हणून बुद्धीमान माणसाने उद्या करावयाची कामे आजच करावीत.