Gitamrutam 2023 : सांखळी (गोवा) येथे ४ सहस्र जणांनी केले भगवद्गीतेतील २ अध्यायांचे पठण

संस्कृत भारती गोवा आणि सरकारचे राजभाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने . . .

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची उपस्थिती !

साखळी : डिचोली आणि सत्तरी तालुक्यांतील विविध माध्यमिक विद्यालयांतील अनुमाने साडेतीन सहस्र विद्यार्थी आणि ५०० हून अधिक पालक-शिक्षक यांनी भगवद्गीतेतील १२व्या आणि १५व्या अध्यायांचे पठण केले. संस्कृत भारती गोवा आणि सरकारचे राजभाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सांखळी येथील पालिका मैदानात २ डिसेंबरला आयोजित ‘गीतामृतम्’ या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक यांचा मोठा प्रतिसाद लाभला. या परिसरातील एकूण २७ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात भाग घेतला होता.

भगवद्गीतेच्या अध्यायांचे पठण करतांना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईक, सांखळीच्या नगराध्यक्षा रश्मी देसाई, जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, राजभाषा संचालनालयाचे उपसंचालक श्री. अनिल सामंत, संस्कृत भारतीचे अध्यक्ष श्री. आनंद देसाई, श्री. प्रसाद उमर्ये आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांची समयोचित भाषणे झाली.