संस्कृत भाषेचे सौंदर्य

सज्जनाने स्वतःचा विनाश जवळ आला, तरी दुसर्‍याशी शत्रुत्व न करणे

सुजनो न याति वैरं परहितनिरतो विनाशकालेऽपि ।
छेदेऽपि चन्दनतरुः सुरभयति मुखं कुठारस्य ।।

अर्थ : दुसर्‍याचे कल्याण करण्यात मग्न असलेला सज्जन माणूस स्वतःचा विनाश जवळ आला, तरी दुसर्‍याशी शत्रुत्व धरत नाही. चंदन वृक्षाला तोडत असतांना सुद्धा ते वृक्ष कुर्‍हाडीचे पाते सुगंधित करते.