संस्कृत भाषेचे सौंदर्य

दुर्जनाशी मैत्री, तसेच प्रेम करू नये. कोळसा फुललेला असला, तर जाळतो, तसेच तो थंड असला, तरी निदान हात तरी काळा करतोच.

संस्कृत भाषेचे सौंदर्य

दुसर्‍याचे कल्याण करण्यात मग्न असलेला सज्जन माणूस स्वतःचा विनाश जवळ आला, तरी दुसर्‍याशी शत्रुत्व धरत नाही. चंदन वृक्षाला तोडत असतांना सुद्धा ते वृक्ष कुर्‍हाडीचे पाते सुगंधित करते. 

संस्कृत भाषेचे सौंदर्य

संकट येण्यापूर्वीच त्याच्या प्रतिकाराची सिद्धता करून ठेवावी. घराला आग लागल्यावर ती आग विझवण्यासाठी पाणी हवे; म्हणून विहीर खणणे योग्य नाही.

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य

उद्या कुणाचे काय होईल, हे कुणालाही कळत नाही; म्‍हणून बुद्धीमान माणसाने उद्या करावयाची कामे आजच करावीत.

संस्कृत भाषेचे सौंदर्य

‘उत्तम जातीच्या झाडापासून बनवलेल्या पंख्याप्रमाणे चांगल्या वंशात जन्मलेला माणूस असतो’, असे मला वाटते; कारण पंखा स्वतःभोवती फिरून फिरून दुसर्‍यांचा ताप कमी करतो आणि सज्जन वाटेल..

आपण आधुनिक झाल्याने मुलांना फ्रेंच, इटॅलियन भाषा शिकवू इच्छितो; मात्र देवभाषा संस्कृत नाही ! – अभिनेत्री ईशा तलवार

असे किती हिंदु अभिनेत्रींना वाटते, हाही एक संशोधनाचा विषय होऊ शकतो !

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य !

दुष्‍ट व्‍यक्‍तीविषयी शास्‍त्रवचने
खलानां कण्‍टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया।
उपानन्‍मुखभङ्‍गो वा दूरतो वा विसर्जनम्॥
अर्थ : दुष्‍ट मनुष्‍य आणि काटे यांचा दोनच प्रकारे प्रतिकार करता येतो. चपलेने फोडून काढणे अथवा दुरूनच टाळून जाणे.

संस्‍कृत भाषेचे सौंदर्य !

संकटकाळी बुद्धीसुद्धा मलीन होणे
असम्‍भवं हेममृगस्‍य जन्‍म तथापि रामो लुलुभे मृगाय।
प्रायः समापन्‍नविपत्तिकाले धियोऽपि पुंसां मलिनीभवन्‍ति॥
अर्थ : सोन्‍याच्‍या हरिणाचा जन्‍म अशक्‍य; पण रामाला त्‍याचा लोभ वाटला. संकटकाळी बहुधा बुद्धीमंतांची बुद्धीसुद्धा मलीन होते.

गोवा सरकार संस्कृत पाठशाळा आणि केंद्रे यांना अनुदान देणार !

गोव्यात प्रत्येकी ३ संस्कृत पाठशाळा आणि संस्कृत केंद्रे आहेत. या योजनेच्या अंतर्गत सरकार संबंधित संस्थांना १०० टक्के वेतन अनुदान, तसेच पाठशाळेसाठी वार्षिक देखभाल खर्च ५ लाख रुपये आणि संस्कृत केंद्रासाठी १ लाख रुपये देण्यात येणार आहे.

घाटकोपर येथील गुजराती भाषेतील फलक तोडला !

मराठीबहुल महाराष्‍ट्रात सर्वच फलक किंवा नावांच्‍या पाट्या मराठीत असायला हव्‍यात !