संस्कृत भाषेचे सौंदर्य

दूरदृष्टीने सिद्धता करून ठेवणे महत्त्वाचे असणे

चिन्तनीया ही विपदामादावेव प्रतिक्रिया ।
न कूपखननं युक्तं प्रदीप्ते वह्निना गृहे ।।

अर्थ : संकट येण्यापूर्वीच त्याच्या प्रतिकाराची सिद्धता करून ठेवावी. घराला आग लागल्यावर ती आग विझवण्यासाठी पाणी हवे; म्हणून विहीर खणणे योग्य नाही.

सज्जन माणसांचा चांगुलपणा

विप्रियमप्याकर्ण्य ब्रूते प्रियमेव सर्वदा सुजनः ।
क्षारं पिबति पयोधेर्वर्षत्यम्बोधरो मधुरमम्भः ।।

अर्थ : ढग ज्याप्रमाणे समुद्राचे खारे पाणी पिऊन पावसाच्या रूपात गोड्या पाण्याचा वर्षाव करतो, त्याप्रमाणे सज्जन माणसे त्यांची निंदा करणार्‍यांविषयीही चांगलेच बोलतात.