मातृभाषा आणि मातृभूमी यांविषयीच्या अभिमानाची जाणीव शिक्षणातून संवर्धित व्हावी ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा आग्रह धरण्यात आल्याचे स्पष्ट करून राज्यपाल म्हणाले की, मातृभाषेविषयी आस्था आणि अभिमान जोपासतांना तिच्याविषयीच्या जाणिवा वृद्धींगत होण्यासाठी कृतीशील प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.