इंग्रजीच्या आणि परिणामी मराठीच्याही अर्धवट ज्ञानाने सारा गोंधळ उडालेला दिसतो.

‘महाविद्यालयातील आणि रस्त्यावरची संभाषणे, पत्ते विचारणे-सांगणे, विशेष करून ३९, ४७, ४९ व ६८ हे आकडे वा अशा स्वरूपाचे सम-विषम आकडे इंग्रजीत समजावून सांगावे लागत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा सुळसुळाट झाला आहे. आजीच्या नऊवारी साडी काष्ट्याला ‘डिव्हाइडर’ म्हणणारी त्यांची नात ही पूर्णपणाने आंग्लाळलेली दिसत आहे. ‘प्रॉब्लेम’ किंवा ‘थँक्यु’ आणि ‘सॉरी’ हेही शब्द मराठी कोशातले असावेत, असे वाटण्याजोगी परिस्थिती आहे. इंग्रजीच्या आणि परिणामी मराठीच्याही अर्धवट ज्ञानाने सारा गोंधळ उडालेला दिसतो.’ – डॉ. विश्वास मेहंदळे (१.८.२००२)