मराठीत प्रचलित झालेली परकीय नावे

‘संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्त झाले आणि यादव रामराज्य बुडाले, तेव्हापासून मराठी भाषेवर यवनांचे आक्रमण होऊ लागले. इतकेच नव्हे, तर आम्हाला या परकीय नावारूपांचा अभिमान वाटू लागला.

अ. पुढे पुढे आमची नावे आणि आडनावेही पुसली जाऊ लागली. सुलतानराव, रुस्तमराव, हैबतराव, बाजीराव, शहाजी, पिराजी अशी नावे आली.

आ. वैदिक शास्त्री म्हणवून घेणार्‍यांनीही सुलतानभट, होशिंगभट अशी नावे स्वीकारली.’

– शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (कालनिर्णय, डिसेंबर २००९)