सहकार भारतीची आज आणि १ मे या दिवशी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक ! – विवेक जुगादे

सहकारात संस्कार आणणे आणि प्रशिक्षण देणे यांसाठी मुख्यत्वेकरून कार्यरत अशा, तसेच सहकार क्षेत्रासाठी गेली ४५ वर्षे काम करणार्‍या सहकार भारतीची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक ३० एप्रिल आणि १ मे या दिवशी कणेरी मठ येथे होत आहे.

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) व्यापारपेठेमधील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करा ! – राजू यादव, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

गांधीनगर व्यापार पेठेत वळीवडे कॉर्नर ते ‘चिंचवाड ट्रान्सपोर्ट लाईन’ रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते.

अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्‍यास प्रादेशिक परिवहन मंडळाची टाळाटाळ !

कारवाईची आकडेवारी सांगण्‍यातही चालढकलपणा ! अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्‍यास टाळाटाळ करणार्‍या अधिकार्‍यांचे त्‍यांच्‍याशी संगनमत आहे का ?

कॉ. गोविंद पानसरे यांच्‍याकडील जप्‍त केलेल्‍या ‘डायरी’ची प्रत संशयितांना मिळाली पाहिजे ! – अधिवक्‍ता अमोघवर्ष खेमलापुरे

कॉ. गोविंद पानसरे यांची हत्‍या झाल्‍यावर त्‍यांच्‍याकडे असलेली डायरी पोलीस प्रशासनाच्‍या वतीने जप्‍त करण्‍यात आली होती. या जप्‍त केलेल्‍या ‘डायरी’ची प्रत मिळावी, असे आवेदन न्‍यायालयीन प्रशासनाकडे संशयितांच्‍या अधिवक्‍त्‍यांनी केले आहे.

‘बाळूमामा देवस्थान’चे विश्‍वस्त मंडळ विसर्जित : प्रशासकपदी शिवराज नाईकवाडे यांची नियुक्ती

आदमापूर (तालुका भुदरगड) येथील बाळूमामा देवस्थान मंदिराच्या विश्‍वस्त मंडळाच्या कारभाराच्या विरोधात भक्तांकडून धर्मादाय आयुक्तांकडे विविध तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्याचा निकाल २४ एप्रिलला लागला आणि यानंतर ‘बाळूमामा देवस्थान’चे विश्‍वस्त मंडळ विसर्जित करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

सातबारा उतार्‍याची प्रत देणारे यंत्र ३ वर्षांहून अधिक काळ धूळखात पडून !

‘ए.टी.एम्.’ सारख्‍या दिसणार्‍या एका यंत्रात काही नाणी टाकल्‍यावर सामान्‍य नागरिकांना तात्‍काळ सात-बारा उतारे मिळतील, अशी व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. ही यंत्रे सुमारे ३ वर्षांपूर्वी काही जिल्‍हाधिकारी कार्यालयांत बसवण्‍यात आली होती.

‘जयहिंद मित्रमंडळा’च्या वतीने शिवजयंती उत्सव उत्साहात !

उंचगाव येथील ‘जयहिंद मित्र मंडळा’च्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.

परशुराम जयंतीचे औचित्‍य साधून कोल्‍हापुरात समस्‍त ब्राह्मण समाजाची भव्‍य शोभायात्रा !

परशुराम जयंतीचे औचित्‍य साधून समस्‍त ब्राह्मण समाजाच्‍या वतीने भगवान परशुराम, छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि महात्‍मा बसवेश्‍वर यांची संयुक्‍त पालखी अन् भव्‍य शोभायात्रा यांचे आयोजन करण्‍यात आले होते.

आद्यशंकराचार्यांचा जयंती उत्सव ३० एप्रिलपासून ! – शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी

श्रीमद्जगदगुरु शंकराचार्य पीठाच्या आद्यशंकराचार्यांचा २ सहस्र ५३१ वा जयंती उत्सव ३० एप्रिल ते ५ मे या कालावधीत होत आहे. यात हवन, पूर्णाहुती, कीर्तन, प्रवचन यांसमवेत धर्माची पताका उंचावण्यासाठी हातभार लावणार्‍या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल.

शासकीय रुग्णालयातील मृत अर्भकाचे कुत्र्यांनी तोडले लचके : पोलिसांकडून अन्वेषण चालू

छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन विभागाच्या शेजारी असलेल्या शेडमध्ये भटक्या कुत्र्यांनी मृत अर्भकाचे लचके तोडल्याचा प्रकार २० एप्रिलला सकाळी १० वाजता समोर आला.