छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर येथे मूक आंदोलन !

छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी १६ जून या दिवशी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीजवळ मूक आंदोलन करण्यात येणार आहे.

विनयभंग करणार्‍या धर्मांधाला १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा !

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षी एका युवतीला स्नानगृहात गेल्यावर स्नानगृहाच्या भिंतीवर चढून डोकावून पहात असल्याने एक धर्मांधाला अटक करून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आणि या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवत १ वर्षांची शिक्षा सुनावली.

पन्हाळगड ते विशाळगड पावनखिंड मोहीम स्थगित करून रक्तदान शिबिरांचे आयोजन ! – कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊंटेनिअरींग असोसिएशन

१२ आणि १३ जुलै या दिवशी पावनखिंड संग्रामावर आधारीत ‘फेसबूक लाईव्ह’ हा दृकश्राव्य कार्यक्रम सर्व संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे.

कोल्हापुरात शनिवार, रविवार कडक दळणवळण बंदी !

यात वृत्तपत्र मुद्रण, विक्री, रुग्णालये, औषधे विक्री, निर्मिती, शेतीची कामे, अत्यावश्यक सेवेतील दुकाने, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (बस), माल वाहतूक, बसेस, लांब पल्ल्याचा रेल्वेचा प्रवास चालू रहाणार आहे.

पाण्याची पातळी वाढवण्यासाठी भूजल पुनर्भरण आवश्यक ! – मल्लीनाथ कलशेट्टी, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकासयंत्रणा

‘पाऊस पाणी संकलन आणि भूजल प्रदूषण’, या विषयावरील ‘वेबिनार’मध्ये ते बोलत होते.

शहरातील धोकादायक इमारतींवर कारवाई करा ! – डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक, कोल्हापूर महापालिका

पाऊस आणि संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती टाळण्यासाठी धरणातील पाण्याचे आधीच नियंत्रण ! – दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर 

दोन वर्षांपूर्वी आलेल्या पूर परिस्थितीचा अभ्यास करून मागील वर्षी धरणाच्या पाण्याचे आधीच नियंत्रण केले होते. यावर्षी त्याच पद्धतीने संभाव्य पूर नियंत्रणाचे नियोजन सर्व विभागांच्या समन्वयाने केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

वारकरी संप्रदायातील प्रमुख कीर्तनकार ह.भ.प. भानुदास यादव महाराज यांचा देहत्याग !

ह.भ.प. यादव यांचा सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रति विशेष स्नेह होता. २ डिसेंबर २००१ या दिवशी कोल्हापूर येथील सर्वसंप्रदाय सत्संगात सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत एक वक्ता म्हणून ते सहभागी झाले होते.

सनातनच्या साधिका सौ. सुजाता भंडारी यांच्याकडून अध्यात्मशास्त्रविषयक व्हिडिओचा व्हॉट्सअ‍ॅपद्वारे प्रसार !

सौ. सुजाता भंडारी यांनी कुलदेवीच्या नामजपाचे महत्त्व, दत्ताच्या नामजपाचे महत्त्व आणि लाभ अशा प्रकारे अध्यात्मशास्त्रविषयक माहितीचा व्हिडिओ सिद्ध केला. हा व्हिडिओ यूट्यूब वर अपलोड करून याची लिंक वरील गटामध्ये पाठवली. हा व्हिडिओ ३४६ पेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे

मराठा समाजासाठी आजचा दिवस दुर्दैवी ! – खासदार संभाजीराजे भोसले

न्यायालयात सर्वांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापुढे आपण बोलू शकत नाही. मराठा समाजासाठी आजचा दिवस दुर्दैवी आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या संदर्भात मिळून चर्चा करून काही मार्ग निघतो का ? हे पहावे.