कोल्हापूरच्या अस्मितेस कोणीही डिवचण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना खपवून घेणार नाही ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

कोल्हापूरच्या स्वागत कमानीवर शिवसेनेकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा फलक

विशाळगडावरील अतिक्रमणे हटवून नरवीरांची समाधीस्थळे आणि हिंदूंची मंदिरे यांचा जिर्णाेद्धार करा ! – बजरंग दलाचे नायब तहसीलदारांना निवेदन 

एकीकडे राज्य सरकारने  ‘गडकोट संवर्धन मोहीम’ हाती घेतली आहे आणि दुसरीकडे विशाळगडाच्या ऐतिहासिक वारशाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.

विविध मागण्यांसाठी आशा कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देऊनही त्याची कोणतीही नोंद न घेतल्याने महाराष्ट्र राज्य आशा आणि गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला. त्याचाच एक भाग म्हणून हा मोर्चा काढला.

कोरोना केंद्रातील महिला सुरक्षिततेविषयी तात्काळ पाऊले न उचलल्यास रस्त्यावर येऊन आंदोलन ! – भाजप महिला आघाडीचे निवेदन

भाजप महिला आघाडीच्या वतीने महिलांच्या सुरक्षेविषयी कोरोना केंद्रात महिला सुरक्षेत वाढ करावी, महिला पोलीस यांची नेमणूक करण्यात यावी यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या होत्या.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस : पंचगंगेच्या पातळीत १७ फुटांनी वाढ !

कागल तालुक्यातील बाचणी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाळवा-बाचणी परिसरातील कोल्हापूरला जाणारी वाहतूक बंद झाली आहे.

कोल्हापूर-सोलापूर रेल्वे चालू करा ! – चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

कोल्हापूर ते सोलापूर जाणार्‍या अनेक गाड्या कोरोनामुळे १ वर्षाहून अधिक काळ बंद आहे. यामुळे तीर्थक्षेत्र पंढरपूरला जाऊन विठ्ठल मंदिरामध्ये श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येणार्‍या भाविकांना सध्या कोणताच पर्याय उपलब्ध नाही.

भर पावसात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर येथे ‘मूक आंदोलन’ !

काळ्या रंगाची वेशभूषा आणि दंडावर काळ्या फिती लावून आंदोलनकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर येथे मूक आंदोलन !

छत्रपती खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी १६ जून या दिवशी राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीजवळ मूक आंदोलन करण्यात येणार आहे.

विनयभंग करणार्‍या धर्मांधाला १ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा !

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षी एका युवतीला स्नानगृहात गेल्यावर स्नानगृहाच्या भिंतीवर चढून डोकावून पहात असल्याने एक धर्मांधाला अटक करून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आणि या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवत १ वर्षांची शिक्षा सुनावली.

पन्हाळगड ते विशाळगड पावनखिंड मोहीम स्थगित करून रक्तदान शिबिरांचे आयोजन ! – कोल्हापूर डिस्ट्रिक्ट माऊंटेनिअरींग असोसिएशन

१२ आणि १३ जुलै या दिवशी पावनखिंड संग्रामावर आधारीत ‘फेसबूक लाईव्ह’ हा दृकश्राव्य कार्यक्रम सर्व संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात येणार आहे.