
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – सनातनच्या साधिका सौ. सुजाता भंडारी यांचे माहेर सांगली येथे आहे. सांगली जिल्हा महिला संघटनेच्या वतीने ज्या महिलांचे माहेर सांगली येथे आहे त्यांच्यासाठी २५ एप्रिल ते ९ मे या कालावधीत व्हर्च्युअल संमेलनाचे आयोजन केले होते. यात ४०० हून अधिक महिलांचा समावेश आहे. या सर्वांसाठी व्हॉट्सअॅप गट सिद्ध करण्यात आला होता. या गटासाठी सौ. सुजाता भंडारी यांनी कुलदेवीच्या नामजपाचे महत्त्व, दत्ताच्या नामजपाचे महत्त्व आणि लाभ अशा प्रकारे अध्यात्मशास्त्रविषयक माहितीचा व्हिडिओ सिद्ध केला. हा व्हिडिओ यूट्यूब वर अपलोड करून याची लिंक वरील गटामध्ये पाठवली. हा व्हिडिओ ३४६ पेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे.
प्रारंभी गट सिद्ध केल्यावर या गटात महिला योगासने, गायन, नृत्य, स्वयंपाक, लंघन यांसह विविध विषयांची माहिती पाठवत असत. ही माहिती पाहून सौ. सुजाता भंडारी यांनी या गटाच्या व्यवस्थापकांना साधनेच्या विषयाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी अनुमती मागितली. व्यवस्थापकांनी ती दिल्यावर ७ मे या दिवशी त्यांनी वरील माहितीची लिंक व्हर्च्युअल संमेलनाच्या गटात पोस्ट केली. ही माहिती अनेकांनी आवडल्याचे सांगितले.
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !