आम्हाला पाकसमवेत रहायचे नसून भारतात विलीन व्हायचे आहे !  

पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांची घोषणा : भारतानेही गांधीगिरी सोडत पुढाकार घेऊन पाकव्याप्त काश्मीर आता मुक्त करून भारताच्या नियंत्रणात आणले पाहिजे !

पाकमधील विद्यार्थांना शिकवला जात आहे जिहाद !

व्हिडिओमध्ये हा शिक्षक पंजाबी भाषेत, ‘महंमद पैगंबर यांचा कुणी अवमान केला, तर त्यांची हत्या करा. तुम्ही काश्मीरमधील मुसलमानांना साहाय्य करण्यासाठी सिद्ध व्हा आणि भारताच्या विरोधात युद्ध करा’, असे तो शिकवत असल्याचे दिसत आहे.

सरकारपेक्षा वेगळे मत व्यक्त करणे म्हणजे देशद्रोह नाही ! – सर्वोच्च न्यायालय

फारूख अब्दुल्ला यांच्या विरोधात याचिका करणार्‍याला ५० सहस्र रुपयांचा दंड !

हिंदूंसाठी अजूनही काश्मीर असुरक्षित !

काश्मीरची राजधानी श्रीनगरमधील अत्यंत संवेदनशील भागात असणार्‍या कृष्णा ढाब्यावर जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात ढाब्याच्या मालकाचा मुलगा घायाळ झाला होता. त्याचा उपचार चालू असतांना मृत्यू झाल्यावर हिंदूंमध्ये पुन्हा संतापाची लाट उसळली.

आक्रमणात घायाळ हिंदु तरुणाचा उपचारांच्या वेळी मृत्यू

काश्मीरमध्ये अद्यापही हिंदू असुरक्षित आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

जम्मू-काश्मीरमध्ये जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधून सिद्ध !

रेल्वे अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार संभाव्य आतंकवादी आक्रमणे आणि भूकंप यांच्यापासून बचावासाठी पुलामध्ये विशेष सुरक्षा प्रणाली असेल. पुलाची एकूण लांबी १ सहस्र ३१५ मीटर असणार आहे.

अनधिकृतपणे सरकारी बंगल्यात रहाणारे माजी मंत्री आणि आमदार यांची हकालपट्टी करा ! – जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचा आदेश

असा आदेश का द्यावा लागतो ? प्रशासन थेट कारवाई का करत नाही ? अशी कारवाई न करणार्‍या सरकारी अधिकार्‍यांवरही कारवाई करायला हवी !

३१ वर्षांनंतर उघडण्यात आले श्रीनगरमधील शीतलनाथ मंदिर !

जिहादी आतंकवादामुळे गेली ३१ वर्षे बंद असलेले येथील हब्बा कदल भागातील शीतलनाथ मंदिर वसंत पंचमीच्या दिवशी भाविकांसाठी उघडण्यात आले.

जम्मू-काश्मीरला योग्य वेळी राज्याचा दर्जा देण्यात येईल ! – गृहमंत्री अमित शहा

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर ‘जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक’ लोकसभेत मांडण्यात आले. विधेयकावरील चर्चेवेळी विरोधी पक्षांनी यावर काही प्रश्‍न उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देतांना शहा यांनी वरील घोषणा केली.

अमेरिकेला सुनवा !

अमेरिकेतील भारतीयांनी भारताची बाजू उचलून धरली पाहिजे; कमीतकमी भारताचा अवमान किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होणार्‍या गोष्टींना सामाजिक माध्यमांवर निषेधाचा सूर लावायला हवा. अमेरिका ही भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी आहे. आक्रमकपणे तिला प्रत्युत्तर देत राहिले, तरच ती ताळ्यावर येईल !