अंमलबजावणी संचालनालयाकडून महाराष्ट्र आणि कर्नाटक येथे धाडसत्र !

आयकर विभागात होणारा भ्रष्टाचार म्हणजे कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार !

सोलापूर येथे आयकर विभागाकडून व्यावसायिकांवर धाडी !

करचोरी करणार्‍या व्यापारी आणि व्यावसायिक यांच्या विरोधात कारवाई करत रोखीने आणि कच्च्या कागदांवर झालेल्या व्यवहारांची कागदपत्रे आयकर विभागाने जप्त केली आहेत. मागील २ मासांपूर्वी आयकर विभागाने शहरातील विविध रुग्णालयांवर केलेल्या धाडीमध्ये १०० कोटी रुपयांचा गैरप्रकार समोर आला होता.

राज्‍यातील पशूवधगृहांवर आयकर विभागाच्‍या धाडी !

पशूवधगृहांकडून देण्‍यात आलेल्‍या विवरण पत्रात काही त्रुटी असल्‍याने आयकर विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणी आयकर विभागाने काही कामगारांना संबंधित आस्‍थापनातून बाहेर काढले आहे.

उत्तरप्रदेशातील मांस व्यावसायिक कुरेशी याच्या ठिकाणांवर आयकर विभागाच्या धाडी

मांस व्यावसायिक हाजी शकील कुरेशी याच्या लक्ष्मणपुरी, बरेली आणि उन्नाव येथील ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी घातल्या.

नागपूर येथील ३ मोठ्या व्यावसायिक समूहांवर आयकर विभागाची धाड !

कारवाईच्या दुसर्‍या दिवशी याच पथकाने विविध ठिकाणांहून महत्त्वपूर्ण दस्तावेज आणि दागिने जप्त केले आहेत, तर काही ठिकाणी मारलेल्या धाडीत पथकाच्या हाती काहीही लागले नाही. या कारवाईविषयी आयकर विभागाच्या वतीने अत्यंत गुप्तता बाळगण्यात येत आहे.

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निकटवर्तीय अधिकार्‍यांच्या घरी ईडीच्या धाडी

या धाडींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, ‘‘भाजप  आमच्याशी थेट लढू शकत नाही; म्हणून तो कधी ईडी, तर कधी आयकर विभाग यांचे माध्यम वापरून आमच्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे.

पक्षनिधीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची आयकर चोरी उघड !

आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी या पक्षाच्या अध्यक्षाला या व्यवहाराविषयी विचारणा केली. त्या वेळी त्याने केवळ नावापुरते आणि ‘स्टेट्स’ साठी अध्यक्ष असून पक्षनिधी आणि इतर व्यवहार हे कर्णावती येथील लेखा परिक्षकाकडून (ऑडिटरकडून) केले जात असल्याचे त्याने सांगितले.

संभाजीनगर येथे ७ ठिकाणी आयकर विभागाची धाड !

७ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता आयकर विभागाच्या ४-५ पथकांनी शहरातील एकूण ७ ठिकाणी धाडी घातल्या. यामध्ये ४ उद्योजकांच्या निवासस्थानांचा समावेश आहे. शहरातील मोठे उद्योजक सतीश व्यास यांच्या ज्योतीनगर येथील निवासस्थानी पहाटे ४ वाजता आयकर विभागाने धाड टाकली.

आयकर विभागाकडून १०० ठिकाणी एकाच वेळी धाडी !

उत्तराखंड, उत्तरप्रदेश, देहली, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आदी राज्यांमध्ये या धाडी घालण्यात आल्या. राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे राज्यमंत्री राजेंद्र यादव आणि त्यांचे नातेवाईक यांच्या ५३ हून अधिक ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या.

पंढरपूर येथे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांवर प्राप्तीकर विभागाची कारवाई ! 

पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि ‘डीव्हीपी’ उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभिजित पाटील यांचे पंढरपूर शहरातील निवासस्थान आणि कार्यालय येथे प्राप्तीकर विभागाच्या अधिकार्‍यांनी २६ ऑगस्ट या दिवशी एकाच वेळी धाड टाकली.