नाशिक येथे बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड !

३ सहस्र ३३३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त !

नाशिक – येथील नामांकित करबुडव्या बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, फार्म हाऊस आणि निवासस्थाने या ठिकाणी आयकर विभागाने घातलेल्या धाडीत ३ सहस्र ३३३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाची ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. २० एप्रिलच्या पहाटेपासून चालू झालेले हे धाडसत्र सलग ५ दिवस चालले. २५ एप्रिलला हे धाडसत्र थांबवण्यात आले. नाशिकसह मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगर येथील आयकर विभागाचे २०० हून अधिक अधिकारी अन् कर्मचारी यांनी एकत्रितपणे ही कारवाई केली.