‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’ची विदेशातून दान घेण्याविषयीची अनुज्ञप्ती निलंबित !

नवी देहली – नियमांचे पालन न केल्यावरून येथील ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’चे ‘फॉरेन काँट्रीब्यूशन रेगुलेशन ॲक्ट’ (एफ्.सी.आर्.ए.) अनुज्ञप्ती केंद्रशासनाकडून निलंबित करण्यात आली आहे. यामुळे आता या संस्थेला विदेशातून दान स्वीकारता येणार नाही. या संस्थेसह ‘ऑक्सफॅम इंडिया’ यावर गेल्या वर्षी आयकर विभागाने धाडी घातल्यानंतर त्याच्या अनुज्ञप्तीविषयी चौकशी चालू होती. गेल्या मासात ‘ऑक्सफॅम इंडिया’ची अनुज्ञप्ती रहित करण्यात आली आहे. ‘सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च’वर आयकर विभागाने धाड घातली होती, तेव्हा या संस्थेच्या अध्यक्षा यामिनी अय्यर होत्या. यामिनी अय्यर काँग्रेसचे नेते मणीशंकर अय्यर यांची मुलगी आहे.